साताऱ्याचे नाव आंतरराष्ट्रीय पातळीवर सुवर्ण अक्षरांनी लिहलेल्या प्रसाद अवघडे याचा सत्कार जिल्हा क्रीडाधिकारी श्री. नितीन तारळकर यांनी केला

सातारा ;  दिनांक 18 ते 20 जुलै 2024 रोजी, भूतान येथे संपन्न झालेल्या साऊथ एशियन कराटे चॅम्पियनशिप स्पर्धेमध्ये महाराष्ट्ररात अव्वल दर्जाचा समजला जाणारा  चॅम्पियन्स कराटे क्लब मधील खेळाडू कु प्रसाद अवघडे याने या स्पर्धेत सुवर्ण पदक पटकावले. आणि कराटे क्षेत्रात सातारा शहराचे नाव आंतरराष्ट्रीय पातळीवर सुवर्ण अक्षरांनी लिहिले,
प्रसाद हा सामान्य कुटुंबात जन्मलेला मुलगा, कराटे ची आवड आणि गुरूंचे योग्य मार्गदर्शन याच्या जोरावर त्याने हे यश संपादन केले.  चॅम्पियन्स कराटे क्लब, महाराष्ट्र. या संस्थेचे संकल्पक व संस्थापक श्री संतोष मोहिते सर हे प्रसादाचे गुरू आहेत. यांनी जे कष्ट प्रसाद वर घेतले त्या कष्टाचे प्रसाद ने सोने करून दाखवले. आणि जिद्द व चिकाटीच्या जोरावर भारतासाठी सुवर्ण पदक खेचून आणले. प्रसाद ने  या आधी सुद्धा सब ज्युनियर गटामध्ये सातारा जिल्हा साठी शालेय राष्ट्रीय कराटे स्पर्धेमध्ये पहिले ऐतेहसिक पदक मिळविण्याचा मान त्याने मिळवला होता. तसेच आता तर आंतरराष्ट्रिय कराटे स्पर्धेमध्ये गोल्ड जिंकणार प्रसाद हा सातारा जिल्ह्यातील पहिला खेळाडू आहे. यापुढे प्रतीक्षा आहे ती  आता जागतिक कराटे चॅम्पियनशिप मध्ये सुवर्ण पदक मिळण्याची. 

 

प्रसाद ने मिळविलेले या यशाबद्दल साताऱ्यातील सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि क्रीडा क्षेत्रातील सर्व मान्यवरांकडून अभिनंदनाचा व शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. आज प्रसाद अवघडे चे सातारा मध्ये आगमन होताच त्याचा जिल्हा संकुल सातारा येथे मान्यवरांच्या हस्ते सत्कार घेण्यात आला.त्यावेळी प्रमुख पाहुणे जिल्हा क्रीडाधिकारी . - श्री. नितीन तारळकर (साहेब ), कोल्हापूर विभागीय शारिरीक शिक्षण शिक्षक महासंघ अध्यक्ष - श्री आर. वाय. जाधव, सातारा जिल्हा शारिरीक शिक्षण शिक्षक संघटणा खजिनदार - श्री . राजेंद्र माने, तालुका क्रीडाधिकारी श्री. सुनिल कोळी, श्री. सुमित पाटील तसेच श्री. मोहन पवार उपस्थित होते.

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला
मुख्यमंत्री पदी एकनाथ शिंदे यांची घोषणा होताच गोव्यात बंडखोर आमदारांचा नाचीन आनंद व्यक्त