लांडेवाडी खून प्रकरणातील संशयित फरारी सरपंचास अटक

सासपडे:- लांडेवाडी ( वारणानगर ) या.सातारा येथे ९ में रोजीच्या पहाटे प्रेम प्रकरणाच्या संशयावरून सात जणांनी केलेल्या मारहाणीमुळे सोनापूर ता.सातारा येथील गणेश गोरख नावडकर या युवकाचा दि १८ में रोजी उपचारादरम्यान शासकीय रुग्णालयात मृत्यू झाला होता. याप्रकरणी मयताचे वडील श्री गोरख नावडकर यांनी या घटनेची खबर बोरगाव पोलिस ठाण्यात दिली. या फिर्यादी वरुन पोलिसांनी संशयित सात जणांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

 

त्यावेळी एकूण सहा जणांना पोलिसांनी अटक केली होती.यामध्ये दोन विधीसंघर्षग्रस्त मुलांनाही अटक करण्यात आली आहे.बाकी चार जणांमध्ये एक मुंबई पोलीस आणी त्याच गावचा माजी सरपंच विकास विश्वास शिंदे , तसेच विद्यमान उपसरपंच विकास जाधव यांचा समावेश आहे. यातील अजून एक संशयित विद्यमान सरपंच कुंदन विश्वास शिंदे ( सध्या रा.अपशिंगे (मि.) मुळ रा. लांडेवाडी (वारणानगर) हा पसार झाला होता.बोरगाव पोलिस सतत शोध घेत होते. परंतु हा फरारी सरपंच पोलिसांना गुंगारा देत होता. परंतु बोरगाव पोलिस ठाण्याचे सपोनि रविंद्र तेलतुंबडे साहेबांनी दोन महीने फरारी असणारा लांडेवाडीच्या सरपंचाच्या मुसक्या आवळल्या.

 

सपोनि रविंद्र तेलतुंबडे यांना खबऱ्याने संशयित अपशिंगे येथील घरी असल्याची खबर दिली आणि सपोनि तेलतुंबडे सो. यांनी डी.बी.पथकास तात्काळ सुचना दिल्या व अखेर संशयित सरपंच कुंदन शिंदे यास दि.२३ जुलैला ताब्यात घेतले. त्यास अटक करून न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने एक दिवसाची पोलीस कोठडी दिली. पोलिस कोठडी आज दि.२४ रोजी संपत असल्याने आज न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने आणखी तीन दिवस पोलिस कोठडीत वाढ केली. पुढील तपास सपोनि रविंद्र तेलतुंबडे सो.करत आहेत.

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला
मुख्यमंत्री पदी एकनाथ शिंदे यांची घोषणा होताच गोव्यात बंडखोर आमदारांचा नाचीन आनंद व्यक्त