दहिवडी पोलिसांनी ट्रॅक्टर ट्रॉली चोरीचा गुन्हा अवघ्या पाच तासात आणला उघडकीस

१२ लाख ५० हजार रुपये चा मुद्देमाल हस्तगत.

आंधळी : सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे यांचे पोलीस स्टाफसह धडाकेबाज कामगिरी करत ट्रॅक्टर ट्रॉली चोरीचा गुन्हा अवघ्या पाच तासात उघडकीस आणला असून  यामधील अरोपी अटक करत १२ लाख ५० हजार रुपये मध्ये मुद्देमाल हस्तगत केला आहे. 


      याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की,  हेमंत धडंबे रा. दहिवडी यांनी पोलीस ठाण्यात त्यांचा  जॉइंटर कंपनीचा ट्रॅक्टर आणि ट्रॉली चोरी झाल्याबाबत गुन्हा दाखल केला होता असं जर गुन्हा दाखल झाल्यानंतर तात्काळ तपासाची चक्रे फिरवून माहिती घेतली असता रेकॉर्डवरील गुन्हेगार अभिजीत भरत पवार रा.शेरेवाडी हा काही दिवसापासून दिवडी गावात फिरत असल्याची माहिती प्राप्त झाली. 

 


   त्यानुसार त्याचा शोध घेतला असता तो कोल्हापूर या ठिकाणी असल्याचे समजले परंतु त्याच्या मोबाईलचे नंबरचे लोकेशन व तांत्रिक बाबीचा उपयोग  केला असता तो कोल्हापुरी ते नसून वडूज येथे असल्याची माहिती प्राप्त झाली त्यामुळे त्यांनी दिलेले खोट्या माहितीच्या आधारे त्याच्यावर चोरीचा संशय बळवल्याने त्यास तुळस येथे ताब्यात घेऊन पोलीस खाक्या दाखवताच त्यांनीच चोरी केल्याचे निष्पन्न झाले असून त्यास अटक करण्यात आले व त्याच्याकडून चोरी करून लपवून ठेवलेला ट्रॅक्टर आणि  ट्रॉलीसह मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. 


     सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक सातारा व उपविभागीय पोलीस अधिकारी वडूज यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे, सहाय्यक फौजदार प्रकाश हांगे, विजय खाडे, बापू खांडेकर, विठ्ठल विरकर, स्वप्निल म्हामणे यांनी केले.

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला
मुख्यमंत्री पदी एकनाथ शिंदे यांची घोषणा होताच गोव्यात बंडखोर आमदारांचा नाचीन आनंद व्यक्त