सांगवी गावातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न तात्काळ मार्गी लावणार ... सभापती शिवांजली भोसले

सांगवी फलटण.:  ग्रामपंचायत सांगवी येथील ग्रामीण पेयजल योजनेअंतर्गत बांधण्यात आलेली पाण्याची टाकी कोसळल्याची माहिती मिळाल्यानंतर ग्रामस्थांच्या मागणीनुसार तात्काळ सभापती शिवांजली भोसले यांनी घटनास्थळी भेट देऊन संबंधित अधिकाऱ्यांच्या समवेत प्रत्यक्ष पाहणी केली.


यावेळी ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे तालुका उपअभियंता भुजबळ  व त्यांच्या संपूर्ण सहकारी कार्यालय टीमला तात्काळ घटनास्थळी उपस्थित राहण्याबाबत सूचना देऊन . संबंधित अधिकाऱ्यांकडून टाकीच्या नुकसानीचे मोजमाप करून सविस्तर अहवाल तयार करण्याच्या तसेच तो अहवाल लवकरात लवकर जिल्हास्तरीय तांत्रिक पथकाकडे पाठविण्याच्या सूचना देण्यात आल्या.


तसेच सांगवी ग्रामस्थांच्या पिण्याच्या पाण्याची कोणतीही गैरसोय होऊ नये यासाठी तात्काळ पर्यायी व्यवस्था उभारण्याचे, आवश्यक त्या उपाययोजना राबविण्याचे आणि पाणीपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्याचे निर्देश संबंधित विभागाला देण्यात आले.


यावेळी सध्याच्या परिस्थितीत गावातील नागरिकांना नियमित व सुरक्षित पिण्याचे पाणी उपलब्ध करून देणे हेच आपले प्राधान्य असल्याचे सभापती शिवाजी भोसले यांनी प्रतिपादन केले आहे. ग्रामस्थांच्या अडचणी दूर करण्यासाठी प्रशासनाने युद्धपातळीवर काम करून लवकरात लवकर आवश्यक कार्यवाही पूर्ण करावी, अशा सूचना देण्यात आल्या.


सांगवी गावातील पाणीप्रश्न मार्गी लागेपर्यंत सातत्याने पाठपुरावा करून ग्रामस्थांना दिलासा देण्यासाठी आवश्यक ती प्रत्येक उपाययोजना करण्यात येईल. अशी ग्वाही त्यांनी सर्व सांगवी माळेवाडी शेंडे वस्ती आणि करचे वस्ती येथील नागरिकांना दिली आहे. 

अतिशय तत्परतेने दुर्घटना घडलेल्या ठिकाणी भेट देऊन सभापती शिवांजली विक्रम सिंहभोसले यांनी ग्रामस्थांच्या व्यथा जाणून खंडित झालेला पिण्याच्या पाण्याचा पुरवठा तात्काळ चालू करण्याबाबत सूचना दिल्यामुळे नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

anandi atta chakki V
सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला