सातारा शहरासह जिल्ह्याच्या पश्चिम भागामध्ये आज पावसाची धुवॉधार बॅटिंग

सातारा : सातारा शहरासह जिल्ह्यात  सोमवारी रात्रीपासूनच धुवॉधार पावसाने सुरुवात केली. शहरात सकाळपासून  धुवॉधार स्वरुपात पाऊस पडू लागला. या पावसामुळे शहरातील रस्त्यांवरुन पाणी वाहू लागले. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात पोलीस चौकीच्या बाजूला मोकळ्या जागेत तळे निर्माण झाले होते.

गेल्या दोन दिवसांपासून पावसाबरोबर वारे असल्याने ऊन-पावसाचा खेळ सुरु होता. हवामान खात्याने दर्शवलेल्या अंदाजानुसार सातारा शहरात मंगळवारी सकाळपासून पावसाचा जोर वाढला होता . या पावसामुळे सातारकर अडोशा घेवून पाऊस जाण्याची प्रतिक्षा करत होते. परंतु पाऊस थांबत नव्हता. या झालेल्या पावसामुळे पोवई नाका परिसरातून बसस्थानकाकडे, क्रांतीसिंह नाना पाटील जिल्हा रुग्णालयाकडे, व जिल्हाधिकारी कार्यालयाकडे जाणार्‍या रस्त्यावरुन पाणी वाहत होते. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात असलेल्या पोलीस चौकीच्या लगतच्या मोकळया जागेत पाणी साठून तळे निर्माण झाले होते. जिल्हा न्यायालयाच्या इमारतीच्या समोरील रस्त्यावर पाणी साठले होते. जिल्हा परिषदेच्या चौकात पाणी साठले होते. या पावसामुळे बॉम्बे रेस्टॉंरंट चौकात वाहतूक कोंडी झाली होती.

 

येथे म्हैस गेली वाहून

सातारा तालुक्यातील काळोशी येथील शेतकरी युवराज रमेश निकम हे म्हैस घेवून चारण्यासठी काळंबाच्या ओढ्याच्या पलिकडे गेले होते. दुपारी पावणे चार वाजण्याच्या सुमारास ओढ्याला पुर आला. तलावाच्या खालच्या बाजने त्यांची म्हैस पाण्यात उतरली होती. ओढ्याला पुराचे पाणी अचानक आले आणि त्यात ती वाहून गेली. म्हैशीचा शोध गावकरी घेत असल्याची माहिती स्थानिक ग्रामस्थांनी दिली.

 

महाबळेश्वर तालुक्यात एकजण वाहून गेला

महाबळेश्वर तालुक्यातील बबन पांडूरंग कदम वय 62 रा. धावरी हे पुराच्या पाण्यात वाहून गेल्याची माहिती प्रशासनाच्यावतीने देण्यात आली. प्रशासनाच्यावतीने त्यांचा  शोध सुरु आहे.

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला
मुख्यमंत्री पदी एकनाथ शिंदे यांची घोषणा होताच गोव्यात बंडखोर आमदारांचा नाचीन आनंद व्यक्त