कुर्बानीचे काळसुसंगत रूप नवे,"बळी नको रक्तदान हवे."

सातारा : बकरी ईद व आषाढी एकादशी  या एकाच दिनी समता,ममता,मानवता उत्सवानिमित्त सर्वांना शुभेच्छा देतानाच महाराष्ट्र अंधश्रध्दा निर्मूलन समिती आणि मुस्लिम सत्य शोधक समाज मंडळ यांनी गेली १० वर्षापासून रक्त दान उपक्रम राबवित असतात.
    येथील माऊली ब्लड बँक येथे   डॉ.हमीद दाभोलकर व डॉ.दिपक माने यांनी रक्तदान करून प्रारंभ केला.
      डॉ.हमीद दाभोलकर म्हणाले, "समाजातील रूढी व परंपरा यांची सुसंगत चिकित्सा करून आर्थिक वा मानसिक शोषण करणाऱ्या रीतींना योग्यपणे निती मूल्य न हरवता पर्याय देऊ शकतो.त्याचा भाग म्हणजे अंनिसची बळी नको, रक्तदान हवे. हा बकरी ईद निमित्तचा हा दशकापासूनचा उपक्रम आहे. त्यास हळू हळू उत्तम  प्रतिसाद मिळत आहे."
          मोहसीन शेख (रहिमतपूर) यांनी रक्तदान केले.ते कुर्बानी बाबत म्हणाले,"कुर्बानी हे त्यागाचे प्रतिक आहे. पण तो त्याग समजोपयोगी व मानवता वर्धक शोषण विरहित असावा. म्हणूनच  हा परिवर्तनीय उपक्रम केला जात असतो." यावेळी विकास तोडकर, प्रशांत पोतदार,शार्वेय पारसनीस, इंद्रजित कदम,उदय चव्हाण, प्रवीण माने आदींनी रक्तदान केले.सदरच्या कार्यक्रमास जिल्हा कार्याध्यक्षा वंदना माने,प्रधान सचिव ऍड. हौसेराव धुमाळ,राज्य सदस्य भगवान रणदिवे,तरुण कार्यकर्ती शामली  माने आणि माऊली ब्लड बँक कर्मचारीवृंद उपस्थित होते.

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला
मुख्यमंत्री पदी एकनाथ शिंदे यांची घोषणा होताच गोव्यात बंडखोर आमदारांचा नाचीन आनंद व्यक्त