जी-ट्वेंटी चे अध्यक्ष पद मिळणे भारतास भूषणावह-डॉ. सचिन सरदेसाई.

खटाव  : औंध ता.खटाव येथील राजा श्रीपतराव भगवंतराव महाविद्यालय येथे राष्ट्रीय सेवा योजनेच्या वतीने जी-ट्वेंटी शिखर परिषद या विषयावर प्रबोधन पर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. सदर कार्यक्रमाच्या अध्यक्ष महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. शकुंतला सावंत होत्या. कार्यक्रमाचे प्रास्ताविक एन.एस.एस. समन्वयक डॉ. हनुमंत पोळ यांनी केले. प्रमुख पाहुण्यांची ओळख प्रा. सुधाकर कुमकर यांनी करून दिली.
प्रमुख पाहुणे प्रा.सरदेसाई म्हणाले की.G-20 गटातील देशांचा जागतिक व्यापारात ७५ टक्के वाटा असून जागतिक आर्थिक उत्पादनात ८५ टक्के वाटा आहे. त्यामुळे या परिषदेमध्ये झालेल्या निर्णयाचे सामाजिक,आर्थिक व राजकिय परिणाम जगातील सर्व देशांच्या अर्थव्यवस्थे वरती होत असतात. G-20 परिषदेमुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर भारतीय अर्थव्यवस्थेचे महत्त्व अधोरेखीत झाले असून वेगाने वाढणाऱ्या अर्थव्यवस्थेला या परिषदेमुळे बळकटी प्राप्त झाली आहे. 
           G-20 गटाने प्रामुख्याने समग्र आर्थिक समस्या वरती लक्ष केंद्रित केले आहे. याबरोबरच पर्यावरण, हवामान बदल, शाश्वत विकास, आरोग्य, कृषी व महिला सक्षमीकरण या प्रमुख विषयावरती सामाजिक, आर्थिक व राजकीय दृष्टीने महत्वपूर्ण चर्चा झाली.
          कार्यक्रमाचे सूत्रसंचालन  प्रा.शहनाज मोमीन यांनी केले व आभार प्रा. सर्जेराव भोसले यांनी मानले .सदर कार्यक्रमास महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक,प्रशासकीय सेवक वर्ग, विद्यार्थी आणि विद्यार्थिनी उपस्थित होते.

आम्हाला जोडण्यासाठी
सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला
मुख्यमंत्री पदी एकनाथ शिंदे यांची घोषणा होताच गोव्यात बंडखोर आमदारांचा नाचीन आनंद व्यक्त