बेघरानी व ज्यांचा रस्त्यावर संसार त्यांनी तिरंगा लावायचा कुठे?

आरएसएसच्या मुख्यालयावर तिरंगा कधीच फडकला नव्हता त्याचं काय?
Where should the homeless and those whose life is on the street hoist the tricolor?

सातारा - भारत देशाचं सोडाच आजही उत्तर महाराष्ट्रामध्ये आदिवासी जमातीमध्ये केवळ जागा नाही म्हणून घरकुल मिळत नाही आणि घरकुल नाही म्हणून साध्या छपरात राहणारी आमची माणसं शिवाय ज्यानी रस्त्यावर संसार थाटलाय ज्यांना घर ही आणि जागाही नाही त्यांनी तिरंगा कुठे लावायचा असा गोंडस सवाल पुरोगामी संघर्ष परिषदेचे वरिष्ठ राज्य उपाध्यक्ष अनिल (बापू) पानपाटील  यांनी भारत देशाच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त "हर घर तिरंगा" या अभियांना अंतर्गत केंद्र सरकारला विचारत असताना या लोकांच्या मनामधलं देशप्रेम यांनी कसे दाखवावे याचं स्पष्टीकरणही प्रसिद्धीस दिसलेल्या पत्रकामध्ये मागितलं आहे. प्रसिद्धिपत्रकात पुढे पानपाटील म्हणाले की, नागपूर 176/2001 हा खटला काय होता? तर नागपूरच्या आरएसएस मुख्यालयांमध्ये 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनादिवशी ज्या तीन तरुणानी देशभक्तीच्या घोषणा देऊन मुख्यालयाच्या इमारतीवर तिरंगा फडकवल्यावर तुम्ही  त्यांच्यावर गुन्हा दाखल करत असाल तर आता तुम्ही कुठल्या तोंडाने हर घर तिरंगा हे अभियान राबवत आहात ? आता तुम्हाला देशभक्ती कुठून सुचली ?असे परखड सवाल विचारले असून भविष्यामध्ये तुम्ही जर गरिबांना घर आणि नोकरी देणार नसाल शिवाय सत्तेसाठी फसवं राजकारण करणार असाल तर पुरोगामी संघर्ष परिषदेचे राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष संघर्षनायक प्रा. सुभाष वायदंडे यांचे नेतृत्वाखाली गरिबांचे घर आणि नोकरीसाठी टोकाचा संघर्ष करणार असल्याचेही अनिल पानपाटील यांनी प्रसिद्धी पत्रकात शेवटी म्हटले आहे.

 

आम्हाला जोडण्यासाठी
सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला
मुख्यमंत्री पदी एकनाथ शिंदे यांची घोषणा होताच गोव्यात बंडखोर आमदारांचा नाचीन आनंद व्यक्त