जुनी पेन्शन - ढोंग बंद करा. सरकारी कर्मचाऱ्यांना एका नागरिकाने विचारलेले प्रश्न
व्हायरल पोस्टSatara News Team
- Sun 19th Mar 2023 05:37 pm
- बातमी शेयर करा
सरकारी नोकर खाजगी क्षेत्रातील लोकांना पण पेन्शन मिळावी, शेतकऱ्यांना पण मिळावी म्हणून मागणी का करत नाहीत? आणी पेन्शन बंद होऊन १८ वर्षे झाली. आत्तापर्यंत काय करत होते. बंद केली तेव्हा काय करत होते? शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या तशा सरकारी कर्मचाऱ्यांनी किती आत्महत्या केल्या? आकडेवारी देऊ शकता का? सरकारी कर्मचारी भ्रष्टाचाराविरुद्ध आंदोलन का करत नाहीत? काम हे काम असते. त्याचे तुम्ही पेमेंट घेता. लोकांवर उपकार करत नाही. तुम्ही करता ती सेवा नाही तर नोकरी आहे. शेतकऱ्यांइतके कष्ट तुम्ही करत नाही. ॲन्टी करप्शन ब्युरो सरकारी नोकरांसाठीच का स्थापन करण्यात आला असावा? खाजगी क्षेत्रातील व शेतकऱ्यांसाठी का नाही? एकदाचं सांगुनच टाका तुमची पोटं सामान्य कष्टकऱ्यांसारखीच आहेत की Larg XL+ आहेत. तुम्हाला पेन्शन पाहिजे, तुमच्या नंतर पत्नीला पण पाहिजे,अनुकंपा कोट्यातून पोरांना नोकरी पण पाहिजे. तुम्हाला समाधानाचा ढेकर येणार तरी कधी? तुम्ही जर एवढे प्रामाणिक आहात मग सुट्टीच्या दिवशीच्या पगाराला नकार का देत नाही. तुम्ही जर कष्टाळू आहात, लो प्रोफाइल आहात,तुमचे पाय जमिनीवर आहेत मग लोकांना ५० हेलपाटे का घालावे लागतात? बोजा चढण्यासाठी उतरवण्यासाठी लोकांना पैसे का द्यावे लागतात? खरेदी केलेल्या मिळकतीवर नामांतर करण्यासाठी पैसे का द्यावे लागतात? तुम्ही असताना मेलेल्या माणसाच्या मिळकती कशा विकल्या जातात? तुम्ही असताना एक प्राॅपर्टी ३/४ माणसांना कशी विकली जाते. तुम्ही असताना गौण खनिज उत्खनन कसे होते? तुम्हां लोकांना कोणत्याही मार्गाने आलेला पैसा प्रिय कसा असतो. तुम्ही कर्तव्यात कसूर करत नाही मग "सरकारी काम सहा महिने थांब" हि म्हण प्रचलित कशी झाली? "हात गरम करणे" "चहापाणी" "टेबलाखालुन" " फाईलवर वजन ठेवणे" "चिरीमिरी" या शब्दांचे अर्थ जरा इस्कटून सांगाल का? तुमच्याच खात्यातील लोकांचे प्रवास भत्ते मिळण्यासाठी कमिशन घेता का नाही? कोणत्याही प्राॅपर्टीचे हस्तांतरण सरकारला भरलेल्या स्टॅम्प ड्युटीत का होत नाही? असं कोणतं काम आहे जे तुम्ही विनामोबदला करता? रेव्हेन्यू व RTO, पोलिस खाते बदनाम का आहेत? RTO ऑफिस मध्ये कोणतेही काम करताना एजंटची गरज का लागते? विना एजंट काम करायचे म्हणले की तारीख पे तारीख का मिळते? कोणत्याही ऑफिस, शालेय खरेदीत कमिशनखोरी होते की नाही? तुम्ही जर इतके चांगले गुरुजी,शिक्षक,सर,प्रोफेसर आहात मग कोचिंग क्लासेस कसे उदयाला आले? सरकार तुम्हाला ५० हजारा पासुन १/१.५ लाख पगार देत असताना शालेय व ११/१२ वी च्या विद्यार्थ्यांना १/२ लाख घालवून क्लासेस का लावावे लागतात? क्लासेस विरोधात तुम्ही आंदोलन का करत नाही? तुम्ही गुरुतुल्य असताना पेपर कसे फुटतात? काॅप्या पुरवुन परिक्षा कशा होतात? दुर्जनांना खाकीचा दरारा वाटण्याऐवजी सज्जनांना का वाटतो? "पोलिस स्टेशन आणी कोर्टाची पायरी चढू नये" असे लोक का म्हणत असावेत? सरकारी हाॅस्पिटल मधील पेशंटांना खाजगीत जाण्यासाठी रेफर कोण करते? सरकारी लॅब असताना खाजगी लॅब रेफर का केल्या जातात? सक्षम वनखाते असताना वृक्षतोड कशी होते? एकच रस्ता २० वर्षात १० वेळा का करावा लागतो? राजकारणी, भ्रष्टाचारी कर्मचाऱ्यांची प्रकरणे तुम्ही व्हिसल ब्लोअर म्हणून का उघडकीस आणत नाही? "काम लाल फितीत अडकणे" म्हणजे काय? किंवा "लालफिताशाही" म्हणजे काय सांगाल का? शेतकरी जास्त उत्पादन घेत आहेत इतके की भाव पडत आहेत, कंपन्यांमधील कामगार त्यांचे टार्गेट अचिव्ह करत आहेत. ऑर्डर प्रमाणे प्रोडक्शन देत आहेत, मग तुम्ही नेहमी मागेच का राहाता? तुमची कृपा नेमकी अडकते कुठे? BSNL सारखी कंपनी कर्मचाऱ्यांनी कशी डुबवली? कारण काय? कोर्टात केसचे निकाल २०/३० वर्षे का लागत नाहीत? निकाल लागल्यानंतर त्याची अंमलबजावणी व्हायला परत १०/१५ वर्षे का लागतात? तुम्ही करता ते तुमचे काम आहे, उपकार नाही.
मला तुम्हाला दोनच शेवटचे प्रश्न विचारायचे आहेत.
तुम्हाला हक्क कळतात तशी कर्तव्ये का कळत नाहीत?
आणी कळणार तरी कधी?
ही व्हायरल पोस्ट आहे सातारा न्यूज याच समर्थन करत नाही
स्थानिक बातम्या
कुसुंबी गणात मंत्री शिवेंद्रराजेंचा करिष्मा चालणार
- Sun 19th Mar 2023 05:37 pm
फलटण तालुक्यात शिवसेना एकनाथ शिंदे गट आता होणार प्रबळ दावेदार.
- Sun 19th Mar 2023 05:37 pm
फलटण पंचायत समिती सदस्य पदासाठी सांगवी गणातून सौ .सारिका संजय सोडमिसे प्रबळ दावेदार.
- Sun 19th Mar 2023 05:37 pm
शिक्षण प्रसारक संस्थेचा पूरग्रस्त विद्यार्थ्यांना मदतीचा हात..
- Sun 19th Mar 2023 05:37 pm
फलटण शहरचे पोलीस निरीक्षक हेमंतकुमार शहा यांची तडकाफडकी बदली
- Sun 19th Mar 2023 05:37 pm
संबंधित बातम्या
-
फलटण तालुक्यात शिवसेना एकनाथ शिंदे गट आता होणार प्रबळ दावेदार.
- Sun 19th Mar 2023 05:37 pm
-
फलटण पंचायत समिती सदस्य पदासाठी सांगवी गणातून सौ .सारिका संजय सोडमिसे प्रबळ दावेदार.
- Sun 19th Mar 2023 05:37 pm
-
शिक्षण प्रसारक संस्थेचा पूरग्रस्त विद्यार्थ्यांना मदतीचा हात..
- Sun 19th Mar 2023 05:37 pm
-
उपमुख्यमंत्री अजित पवार आणि धिरेंद्रराजे खर्डेकर यांची राजकीय भेट
- Sun 19th Mar 2023 05:37 pm
-
औंध महाविद्यालयात स्पर्धा परीक्षा विषयावर कार्यशाळा संपन्न.
- Sun 19th Mar 2023 05:37 pm
-
फलटण येथील गणेश मूर्ती विटंबनेप्रकरणी संबंधितावर गुन्हा नोंद करा .
- Sun 19th Mar 2023 05:37 pm









