वर्धनगड येथील खाशीबाई सावंत (ताई) यांचे निधनाने सामाजिक, सांप्रदायिक नेतृत्व हरपले
निसार शिकलगार - Fri 22nd Jul 2022 01:14 pm
- बातमी शेयर करा
पुसेगाव : वर्धनगड येथील खाशीबाई ज्ञानदेव सावंत यांचे वयाच्या 90 व्या वर्षी वृद्धापकाळाने आज पहाटे साडेपाच च्या दरम्यान निधन झाले. त्यांच्या निधनाने वर्धनगड व परिसरामध्ये हळहळ व्यक्त करण्यात आली.
खाशीबाई ज्ञानदेव सावंत या ताई नावाने वर्धनगड मध्ये प्रसिद्ध होत्या. 90 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये आपले पती कै. ज्ञानदेव सावंत (दादा) यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून दादा सरपंच पदी असताना वर्धनगड च्या विकासासाठी मोठा हातभार लावला होता. दादाच्या निधनानंतर त्यांचे कैलासवासी सुपुत्र शिवाजी सावंत यांनी आपल्या शांत संयमाने वर्धनगड गावचे नेतृत्व करून वर्धनगड च्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्नशील राहिले होते. मुलांनाही नेहमी ताईंची साथ असायची ताईंचे असणारे मुलांच्या वरील सुसंस्कार, आज ही सगळ्या परिसरामध्ये परिचित आहेत. शेवटच्या क्षणापर्यंत कुठल्याही प्रकारचा आजार नाही अथवा कुठलेही व्यंग नाही. शेवटपर्यंत आपल्या शेतातील मातीशी नाळ जोडून, एक उत्तम शेती व मुलांना मार्गदर्शन करणे, नेहमीच महिला व सर्व ग्रामस्थ यांच्याशी हसत खेळत राहून सर्वांच्या सुखदुःखाच्या त्या साक्षीदार होत्या,त्यांचा हसतमुख असलेला नेहमीचा चेहरा,ताईला पाहिले की समाधान वाटायचे,मवाळ बोलणे बोलण्यातील आपुलकी त्यांचे कुटुंबावरील असलेले सुसंस्कार खरोखरीच शेवटच्या क्षणापर्यंत वाखाणण्याजोगे होते. आणि आजही त्यांचे दुसरे सुपुत्र किशोर सावंत ताईच्या आशीर्वादाने वर्धनगड विविध कार्यकारी सोसायटी व्हाईस चेअरमन पदी विराजमान आहेत. तर त्यांचे थोरले सुपुत्र वसंत सावंत सामाजिक, तसेच वारकरी सांप्रदायिक क्षेत्रामध्ये नेहमीच आघाडीवर राहून गावाच्या आध्यात्मिक तसेच वारकरी सांप्रदायिक कार्यामध्ये आघाडीवरच असतात, त्यांचे नातू सुभाष सावंत हे राष्ट्रीय पातळीचे संभाजी ब्रिगेड या संघटनेचे प्रमुख पदाधिकारी असून ते मुंबईमध्ये कार्यरत आहेत. अशा गुणवंत व नामवंत कुटुंबाला तसेच गावाला प्रेरणा देणाऱ्या ताई आज पहाटे साडेपाच वाजता वृद्धापकाळाने त्यांना निधन झाले त्यांच्या जाण्याने. सर्व वर्धनगड व परिसरामध्ये हळहळ व्यक्त करण्यात येत होती यांचे पाठीमागे मुले सुना नातवंडे असा परिवार आहे. त्यांचा सावडण्याचा विधी रविवारी सकाळी साडेआठ वाजता वर्धनगड स्मशानभूमीमध्ये करण्यात येणार आहे. परमेश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो हीच ईश्वरचरणी प्रार्थना.
nidhan
स्थानिक बातम्या
साताऱ्यात भुयारी गटार योजना वाऱ्यावर
- Fri 22nd Jul 2022 01:14 pm
विठ्ठलाच्या ओढीने धावणाऱ्या पावलांना बळ देणारा चरणसेवा उपक्रम
- Fri 22nd Jul 2022 01:14 pm
माथेरानला चौकशी समिती, महाबळेश्वरला मोकळे रान? शासनाच्या दुहेरी भूमिकेवर संताप
- Fri 22nd Jul 2022 01:14 pm
रयतराजच्या दणक्याने चड्डी बनियान डॉक्टर निलंबित तर दुसऱ्याची चौकशी.....
- Fri 22nd Jul 2022 01:14 pm
पालखी सोहळा स्वागतासाठी सातारा जिल्हा परिषद सज्ज- डॉक्टर प्रियाताई शिंदे
- Fri 22nd Jul 2022 01:14 pm
संबंधित बातम्या
-
पाचगणीतील कचरा प्रकरणाने स्वच्छता ठेकेदाराच्या कामावर प्रश्नचिन्ह; करारातील जबाबदाऱ्या पाळल्या का?
- Fri 22nd Jul 2022 01:14 pm
-
साताऱ्यात भुयारी गटार योजना वाऱ्यावर
- Fri 22nd Jul 2022 01:14 pm
-
फलटण करांचा सामाजिक चळवळीतला दिलदार मित्र नंदकुमारजी मोरे हरपला.
- Fri 22nd Jul 2022 01:14 pm
-
विठ्ठलाच्या ओढीने धावणाऱ्या पावलांना बळ देणारा चरणसेवा उपक्रम
- Fri 22nd Jul 2022 01:14 pm
-
विशालगडावरील आजचा छत्रपती शिवागमन उत्सव उद्या महोत्सव म्हणून साजरा केला जाईल - उपसभापती अमरसिंह खोत.
- Fri 22nd Jul 2022 01:14 pm
-
फलटण शहरात अन्न औषध प्रशासन मिठाई विक्री केंद्रांवर मेहरबान?
- Fri 22nd Jul 2022 01:14 pm
-
नीरा नदीच्या काठावरील नागरिकांना सतर्कतेचा इशारा.
- Fri 22nd Jul 2022 01:14 pm










