वीर जवान तेजस मानकर यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

सातारा : पंजाबमधील भटिंडा येथे सैन्य तळावर झालेल्या गोळीबारात वीरमरण आलेल्या जावलीच्या सुपुत्रावर आज शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.  करंदोशी येथील तेजस मानकर हे सैन्यदलात पंजाब राज्यातील भटिंडा येथे कर्तव्य बजावत होते. बुधवारी (दि.१२) रोजी सैन्यतळावर झालेल्या हल्ल्यात तेजस मानकर यांच्यासह आणखी ३ जवानांचा मृत्यू झाला होता. तेजस त्यांच्या मृत्यूची बातमी कळताच करंदोशीसह संपूर्ण जावळी तालुक्यावर शोककळा पसरली होती. तेजस यांचे पार्थिव आज सकाळी करंदोशी येथे आणण्यात आले. यावेळी तेजस यांच्या कुटुंबीयांनी फोडलेला हंबरडा पाहून उपस्थितांना अश्रू अनावर झाले होते. वीर जवान तेजस मानकर यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेण्यासाठी हजारोंचा जनसागर लोटला होता. यावेळी खासदार उदयनराजे भोसले, खासदार श्रीनिवास पाटील , आमदार शशिकांत शिंदे, आमदार शिवेंद्रराजे भोसले, दीपक पवार, सौरभ शिंदे, पोलीस उपविभागीय अधिकारी शीतल जानवे-खराडे यांच्यासह मान्यवरांनी जवान तेजस मानकर यांच्यासह पार्थिवाचे अंत्यदर्शन घेतले. यावेळी जवान तेजस मानकर यांची अंत्ययात्रा काढून शासकीय इतमामात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. 

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

anandi atta chakki V
सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला