अण्णाभाऊ साठे बहुजन नायक पुरस्कारासाठी प्रस्ताव पाठविण्याचे आवाहन

कराड :  केसे,तालुका कराड येथील आदर्श lमाता कांताबाई बाबुराव मोहिते प्रतिष्ठान च्या वतीने चालू वर्षापासून विविध क्षेत्रांमध्ये काम करून समाजासाठी आपला अनमोल वेळ देणाऱ्या कार्यकर्त्याचा अण्णाभाऊ साठे बहुजन नायक 2022 हा पुरस्कार देऊन सन्मान करण्यात येणार असून इच्छुकांनी प्रस्ताव तात्काळ पाठवावेत असे आवाहन प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष विश्वास मोहिते यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे.

 साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती च्या निमित्ताने  विविध क्षेत्रांमध्ये कार्यरत असून सुद्धा समाजासाठी आपल्या जीवनातील अनमोल वेळ देऊनही आणि महापुरुषांच्या विचारांवरती काम करीत असून देखील काही माणसे पडद्यामागे राहत असतात यांचा सन्मान होणे काळाची गरज आहे म्हणजे त्यांनाही सामाजिक कार्यात सक्रिय असल्याचे समाधान लाभेल त्याचबरोबर इतरही त्यांच्या कामाचा आदर्श घेतील या उद्देशाने पाडळी (केसे) तालुका कराड येथील आदर्मामाता कांताबाई बाबुराव मोहिते प्रतिष्ठान च्या वतीने चालू वर्षापासून पुरस्कार आयोजन करण्यात आले आहे.यामध्ये सामाजिक, शैक्षणिक,सांस्कृतिक क्रीडा आणि पत्रकारिता अशा विविध क्षेत्रांमध्ये आपले अनमोल योगदान देणाऱ्या कार्यकर्त्यांचा साहित्यरत्न लोकशाहीर आण्णाभाऊ साठे बहुजन नायक 2022 हा पुरस्कार देऊन गौरव करण्यात येणार आहे. हा गौरव विविध मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात येणार असून इच्छुकांनी आपले सामाजिक कार्याची थोडक्यात माहिती काही छायाचित्र काही वगैरे खालील पत्त्यावर पाठवाव्यात अध्यक्ष विश्वास मोहिते संविधान सदन पाडळी (केसे), तालुका कराड जिल्हा सातारा या पत्त्यावर ती पाठवावेत असे आवाहन विश्वास मोहिते यांनी केले आहे.

आम्हाला जोडण्यासाठी
anandi atta chakki V
सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला