डोळ्यांचा संसर्ग टाळण्यासाठी घरगुती उपाय

डोळा फ्लू टाळण्यासाठी मार्ग: मान्सून सुरू झाला कि डोळ्यांच्या साथीची प्रकरणे वेगाने वधू लागतात, डोळा कोरडा पडणे, खाज सुटणे, सतत चिकट स्त्राव वाहत राहणे अशा समस्या उद्भवतात. शिवाय ही साथ एकामुळे घरातील प्रत्येक सदस्याला येऊ शकते. अशावेळी योग्य काळजी आणि खरबरदरी घेतल्यास हा संसर्ग टाळता येऊ शकतो. ही एक अत्यंत सांसर्गिक स्थिति असल्यामुळे, त्याचा प्रसार रोखण्यासाठी स्वच्छता राखणे आवश्यक आहे.
 
डोळ्यांना संसर्ग झाल्यास वारंवार स्पर्श करणे टाळा, स्वच्छ पाण्याने डोळे धुवा, शक्यतो दूरचा प्रवास टाळा, आणि इतरांपासून दूर राहा, डोळ्यांना हात न लावता रुमाल वापरा. तेलकट पदार्थ खाऊ नका असे काही उपाय करून तुम्ही डोळ्यांचा संसर्ग पासरवण्यापासून राहू शकता.

20-20-20 नियम
कॉम्प्युटरवर जास्त वेळ घालवणे किंवा डोळ्यांवर ताण येऊ शकणारी इतर कामे केल्याने तुमचे डोळे थकून जातात, ज्यामुळे रात्री डोळ्याला खाज सुटू शकते. अशावेळी २०-२०-२० चा नियम पाळण्याचा प्रयत्न करा. म्हणजे ऑफिस कामाच्या प्रत्येक 20 मिनिटांनी, कॉम्प्युटर स्क्रीनपासून दूर पहावे आणि 20 फूट दूर असलेल्या वस्तूकडे 20 सेकंद टक लावून पाहावे, ज्यामुळे डोळ्यांना आराम मिळतो.
 
डोळ्यांचा भाग स्वच्छ ठेवणे
बाहेरील धूळ कण, घाण आणि मेकअपमुळे डोळ्यांना खाज येऊ शकते. त्यामुळे संसर्गाच्या काळामध्ये आय मेकअप शक्यतो करणे टाळा. शिवाय बाहेर जात असाल तर गॉगल लावून जा. रात्री घरी आल्यावर डोळे स्वच्छ धुवा, डोळ्यात जर जळजळ होत असेल तर थंड पाण्याने डोळा धुवा.
 
कॉन्टॅक्ट लेन्सचा वापर बंद करा
कॉन्टॅक्ट लेन्स घातल्याने डोळ्यांना खाज येऊ शकते. काही लोक त्यांचे कॉन्टॅक्ट लेन्स रात्रभर घालून झोपतात, ज्यामुळे हे डोळ्याची समस्या उद्भवू शकते. जोपर्यंत तुमच्या डोळ्याला खाज येत आहे, तोपर्यंत कॉन्टॅक्ट लेन्सचा वापर करणे टाळा. डिस्पोजेबल कॉन्टॅक्ट लेन्स वापरा.

स्वच्छता राखा
बाहेरून आल्यानंतर सर्वप्रथम हात पाय धुवा. संसर्ग टाळण्यासाठी आपले हात नियमितपणे धुवा आणि डोळ्यांना स्पर्श करणे टाळा. कपडे, उशी आणि टॉवेल नियमितपणे धुवा.जर तुम्हाला हंगामी ऍलर्जी असेल तर झोपण्यापूर्वी किंवा बाहेरून आल्यानंतर आंघोळ किंवा शॉवर घ्या.तुम्ही घराबाहेर असता तेव्हा तुमच्या डोळ्यांना परागकण किंवा धुळीपासून वाचवण्यासाठी सनग्लासेस घाला.
 
संक्रमण आठवड्याहून अधिक काळ राहिला असेल, किंवा सात दिवसाहून अधिक वेळ झाल्यानंतरही डोळा पूर्वावस्थेत आला नसल्यास, त्वरित आपल्या नेत्रचिकित्सांकडे जा. आपला डोळा खूप महत्वाचा असून, हलगर्जीपणा करू नका

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला
मुख्यमंत्री पदी एकनाथ शिंदे यांची घोषणा होताच गोव्यात बंडखोर आमदारांचा नाचीन आनंद व्यक्त