महाबळेश्वर तालुक्यातील बुरडाणी गावात हॉटेलला लागली मोठी आग

महाबळेश्वर : सध्या सर्वत्र मुसळधार पाऊस कोसळत असून सातारा जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे. या दरम्यान, महाबळेश्वर तालुक्यातील तापोळा येथील बुरडाणी गावातील एका हॉटेलला मोठी आग लागल्याची घटना आज सकाळी घडली. या आगीनंतर स्थानिक ग्रामस्थांनी याबाबतची माहिती प्रशासनास दिली असून अग्नीशामक दलाच्या दोन गाड्या घटनास्थळी रवाना झाल्या आहेत.


याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, महाबळेश्वर तालुक्यात गेल्या चोवीस तासापासून मुसळधार पाऊस कोसळत आहे. या दरम्यान, आज सकाळीच्या सुमारास तालुक्यातील तापोळा येथील बुरडानी नावाच्या गावात शेलार नावाचे हॉटेल आहे. या हॉटेलला अचानक आग लागली. आगीच्या धुराचे लोट परिसरात पसरू लागल्यामुळे परिसरातील स्थानिक नागरिकांना याची माहिती मिळाली. यानंतर त्यांनी याबाबतची माहिती पोलीस प्रशासनास तसेच अग्निशामक दलास दिली.

हॉटेलला आग लागल्याची माहिती मिळाल्यानंतर अग्निशामक दलाच्या दोन गाड्या तापोळा येथील बुरडानी गावाच्या दिशेने रवाना झाल्या आहेत. तर स्थानिक नागरिकांकडून संबंधित हॉटेलला लागलेली आग विझविण्यासाठी शर्तीचे प्रयत्न केले जात आहेत.

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला
मुख्यमंत्री पदी एकनाथ शिंदे यांची घोषणा होताच गोव्यात बंडखोर आमदारांचा नाचीन आनंद व्यक्त