बोरगाव पोलीसांकडून 2 सराईत गुन्हेगार सातारा जिल्ह्यातून 6 महिन्यांसाठी तडीपार

सातारा : जिल्ह्यातील बोरगाव पोलीस ठाणे हद्दीमध्ये राहणाऱ्या दोघा सराईत गुन्हेगारांवर तडीपारीची कारवाई करण्यात आली आहे. जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या आदेशानुसार दोघांना सातारा जिल्ह्यातून सहा महिन्यांसाठी तडीपार करण्यात आले आहे. अमोल उर्फ गोंज्या आण्णा मोहिते (वय 35 वर्षे रा. नागठाणे ता.जि. सातारा) व विक्रम अधिक यादव (वय 31 वर्षे रा अतीत ता. जि. सातारा) अशी दोघा सराईत गुन्हेगारांची नावे आहेत. याबाबत अधिक माहिती अशी की, पोलीस अधीक्षक समीर शेख व अपर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडुकर सातारा तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. राजीव नवले यांनी आगामी विधानसभा निवडणुकीचे अनुशंगाने सातारा जिल्ह्यातील सराईत गुन्हेगारांवर कठोर व प्रभावी करवाई करण्याबाबत जिल्ह्यातील पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी व पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा, सातारा यांना सुचना दिलेल्या आहेत.  

   सातारा जिल्ह्यातील बोरगाव पोलीस ठाणे हद्दीमध्ये राहणारा अमोल उर्फ गोंज्या आण्णा मोहिते (वय 35 वर्षे रा. नागठाणे ता.जि. सातारा) व विक्रम अधिक यादव (वय 31 वर्षे रा अतीत ता. जि. सातारा) हे सराईत गुन्हेगार बोरगाव पोलीस ठाणे हद्दीत नागठाणे, अतीत परीसरामध्ये आपल्या गुंडगिरीच्या जोरावर दहशत तसेच गुन्हे करीत होते. त्यामुळे नागरिकांना भितीचे वातावरण निर्माण झाले होते. त्याच्यावर अनेक गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत. त्यामुळे बोरगाव पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी सहा पोलीस निरीक्षक श्री रविंद्र तेलतुंबडे यांनी म.पो.का. कलम 56 (1) (अ) (ब) अन्वये तडीपार करणे बाबतचा प्रस्ताव मा.अपर पोलीस अधीक्षक वैशाली कडुकर व उपविभागीय पोलीस अधिकारी श्री राजीव नवले यांचे मार्फतीने हद्दपार प्राधिकरण तथा मा. उपविभागीय दंडाधिकारी सातारा विभाग सातारा यांचेकडे सादर केला होता. सदर प्रस्तावाची चौकशी उपविभागीय दंडाधिकारी सातारा विभाग सातारा यांनी केली होती. 

 सदर सराईत गुन्हेगार अमोल उर्फ गोंज्या आण्णा मोहिते वय-35 वर्षे रा-नागठाणे ता.जि. सातारा व विक्रम अधिक यादव वय-31 वर्षे रा अतीत ता. जि. सातारा यांचेवर दाखल गुन्ह्यामध्ये वेळोवेळी अटक करुन तसेच योग्य त्या प्रतिबंधक कारवाई करुन देखील त्यांचे गुन्हे करण्याच्या प्रवृत्तीत कोणताही बदल झाला नाही ते सातत्याने बोरगाव परीसरामध्ये गुन्हे करीत होते. त्यांच्यावर कायद्याचा कोणताही धाक न राहिल्याने बोरगाव परीसरातील सामान्य जनतेमध्ये भितीचे वातावरण निर्माण होवुन त्यांच्यावर कडक कारवाई करणेची मागणी होत होती. त्यांना हद्दपार प्राधिकरण तथा मा. उपविभागीय दंडाधिकारी सातारा विभाग सातारा यांचे समोर सुनावणी होवुन त्यांनी दोन्ही इसमाना म.पो.का. कलम 56 (1) (अ) (ब) अन्वये सातारा जिल्ह्यातुन 6 महिन्यांकरीता हद्दपार करणेबाबतचा आदेश पारीत केलेला आहे.

 याकामी हद्दपार प्राधिकरणापुढे सरकार पक्षाच्या वतीने श्री समीर शेख पोलीस अधीक्षक सातारा व डॉ. वैशाली कडुकर अपर पोलीस अधीक्षक सातारा, उपविभागीय पोलीस अधिकारी श्री राजीव नवले यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे श्री. अरुण देवकर, बोरगाव पोलीस ठाणेचे प्रभारी अधिकारी श्री रविंद्र तेलतुंबडे, स्थागुशाचे पोहवा अमित सपकाळ, बोरगाव पोलीस ठाणेचे पोलीस नाईक प्रशांत चव्हाण यांनी योग्य तो पुरावा सादर केला आहे.

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला
मुख्यमंत्री पदी एकनाथ शिंदे यांची घोषणा होताच गोव्यात बंडखोर आमदारांचा नाचीन आनंद व्यक्त