गोंदवले बु.!! येथील खून प्रकरणातील फरार सर्व आरोपींना अटक....

दहिवडी पोलीसांची कामगिरी....

आंधळी, दि ८ : गोंदवले बुद्रुक येथील शेताच्या वादातून झालेल्या मारहाणीत व खून प्रकरणांमधील फरार सर्व आरोपींना दहिवडी पोलिसांनी पकडून त्यांना आज अटक करण्यात आले आहे

. दहिवडी पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर नंबर ५१२/२०२४ भारतीय न्याय संहीता २०२३ चे कलम १०३,११५(२),३५२,३(५) प्रमाणे दाखल असलेल्या गुन्हयातील अनिल रघुनाथ कदम वय ५५ वर्षे रा. गोंदवले बु. ता. माण जि सातारा यांचा आरोपी नामे १) दत्तात्रय अरुण यादव २) जयंत दत्तात्रय यादव ३) हर्षद दत्तात्रय यादव यांनी खुन केला असलेबाबत तक्रार दिलेने दिनांक ०६/११/२०२४ रोजी गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. 

 सदर गुन्हा दाखल झाल्यानंतर गुन्हयातील आरोपी नामे जयंत दत्तात्रय यादव वय २३ वर्षे हा पुणे येथे असल्याबाबत माहीती प्राप्त झालेने त्यास तांत्रिक माहीतीचे आधारे वाकड पुणे येथे ताब्यात घेवून त्यास दि. ०६ रोजी अटक करण्यात आली. सदर गुन्हयातील आरोपी नामे १) दत्तात्रय अरुण उर्फ अरविंद यादव वय ५० वर्षे २) हर्षद दत्तात्रय यादव वय २० वर्षे दोन्ही रा. गोंदवलु बु. ता. माण जि. सातारा हे गुन्हा घडलेपासुन फरारी होते. त्यांना दहिवडी पोलीसांनी गोपनिय व तांत्रिक माहीतीचे आधारे आज दि. ०७ रोजी ताब्यात घेवुन त्यांना सदर गुन्हयाचे कामी अटक केली आहे.

 सदरची कामगिरी ही पोलीस अधीक्षक सातारा समीर शेख,अपर पोलीस अधिक्षक सातारा डॉ. वैशाली कडुकर,उपविभगीय पोलीस अधिकारी दहिवडी विभाग कॅम्प वडूज अश्विनी शेंडगे यांच्या मार्गदर्शनाखाली खालील पोलीस अधिकारी आणि अंमलदार यांनी केलेली आहे. सपोनि. अक्षय सोनवणे,पो.हवा. विठठल विरकर,श्रीनिवास सानप,विजय खाडे, पोलीस नाईक स्वप्नील म्हामणे,पोलीस कॉन्स्टेबल अजिनाथ नरबट,मल्हारी खाडे,गणेश पवार

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला
मुख्यमंत्री पदी एकनाथ शिंदे यांची घोषणा होताच गोव्यात बंडखोर आमदारांचा नाचीन आनंद व्यक्त