जावई अन् सासऱ्यानेच चोरले ओगलेवाडीतील 110 तोळे सोने

कराड  : कराड तालुक्यातील ओगलेवाडीत दरोडा टाकून सुमारे ८८ तोळे सोन्याचे दागिने व रोख एक लाख रूपये लंपास केल्याची घटना नुकतीच घडली. या प्रकरणी पोलिसांनी चोवीस तासात दोघा संशयितास ताब्यात घेतले होते. या प्रकरणात कराड शहर गुन्हे प्रकटीकरण शाखेकडून दोघांना ताब्यात घेतल्यानंतर त्यांची चौकशी करत त्यांच्याकडून ८८ तोळे सोन्याचे दागिने व रोख एक लाख रूपये असा मुद्देमाल हस्तगत केला आहे. दोघांना बुधवारी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने तीन दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. या दरोडा प्रकरणात खटाव तालुक्यातील अटक करण्यात आलेल्या आरोपींचे नाते जावई आणि सासरे असे आहे. या चोरीत आणखी कोणाचा सहभाग आहे का? याचा पोलिसांकडून तपास केला जात आहे. 

 विनायक काळे (वय ४६), सिद्धांत भोसले (वय २३) दोघेही (रा. खटाव)अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, कराड तालुक्यातील ओगलेवाडी येथील उद्योजक कै. वसंत दिनकर खाडे यांचे बंद घर फोडून घरातील १०९.५ तोळे सोन्याचे दागिने व रोख दीड लाखांची रक्कम अज्ञात चोरट्यांनी लंपास केल्याची घटना सोमवारी सकाळी उघडकीस आली. 

याबाबत प्रतीक वसंत खाडे यांनी कराड शहर पोलिसांत फिर्याद दाखल केली होती. घटनास्थळी डीवायएसपी अमोल ठाकूर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजू ताशिलदार यांनी भेट दिली.तसेच गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अशोक भापकर यांना तपासाच्या सूचना दिल्या होत्या. त्याअनुषंगाने अशोक भापकर व त्यांच्या टीमने बंगल्याच्या आवारातील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे संशयितांचा शोध सुरू केला. अखेर चोवीस तासाच्या आत विनायक काळे व सिद्धांत भोसले या दोघांना खटाव तालुक्यातील तडवळे येथून ताब्यात घेतले. त्यांच्याकडून चोरीस गेलेल्या सोन्यापैकी ८८ तोळे सोने व रोख एक लाख रूपये असा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. बुधवारी त्यांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने तीन दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे.

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला
मुख्यमंत्री पदी एकनाथ शिंदे यांची घोषणा होताच गोव्यात बंडखोर आमदारांचा नाचीन आनंद व्यक्त