महिला सक्षमीकरण फाऊंडेशन सातारा जिल्हा शहर उपाध्यक्षा पदी सौ मंगल गायकवाड यांची निवड

वाई : महिला सक्षमीकरण फाऊंडेशन हे महिलासाठी काम करत असून महाराष्ट्रात मोठमोठया विद्यालयात पोलीस निर्भया पथक यांना बरोबर घेवून शाळा कॉलेज महिला बचत गट या मधील मुली व महिलांना स्वताच संरक्षण कस करायच तसेच महिलासाठी कायदेविषयक मार्गदर्शन शिबीर, महिलासाठी आरोग्य विषयक माहीती, आर्थिक नियोजन मार्गदर्शन, ताणतणाव मार्गदर्शन, रोजगार मार्गदर्शन, कौटुंबिक हिंसाचार या विषयी मोठमोठ्या कार्यक्रमाचे आयोजन करून या विषयी जनजागृती केली जात आहे. याचे कार्यक्षेत्र संपूर्ण भारतभर आहे
   वाई तालुक्यातील कळंभे गावच्या सौ मंगल गायकवाड यांच्या सामाजिक कार्याची दखल घेवून वाई भाजीमंडई येथील महिला सक्षमीकरण फाऊंडेशन कार्यालय येथे  सौ मंगल मानसिंग गायकवाड यांची ( सातारा जिल्हा शहर उपाध्यक्षपदी ) निवड करुन नियुक्ती पत्र देण्यात आले. त्यांनी गावातील महिला बचत गटांना एकत्र करून. महिला ग्रह उद्योगा विषयी माहीती देवून वेगवेगळ्या बॅकां कशा प्रकारे कर्ज देतात त्याची परत फेड कशी केली जाते.अशा अनेक प्रकारची माहीती त्यांनी गावातील महिला बचत गटांना दिली आहे .
सौ मंगल गायकवाड या महिला बचत गटाच्या C R P म्हणून काम करत असताना कळंभे गावात १७०. कुटूबांना उज्वल गॅस योजनेचा लाभ ही मिळवून दिला आहे या साठी कळंभे गावातील एकून १७ महिला बचत गट एकत्र करून सामाजिक उपक्रम राबवल्यामुळे सातारा जिल्हयात एक वेगळा संदेश या माध्यमातून गेला होता या समाजकार्याची दखल सातारा जिल्हयातील महिला सक्षमीकरण फाऊंडेशनचे
    डॉ श्री अरूण राजपुरे  ( संस्थापक राष्ट्रीयअध्यक्ष महिला सक्षमीकरण फाऊंडेशन ) श्री सतिश इंदलकर (राष्ट्रीय उपाध्यक्ष महिला सक्षमीकरण फाऊंडेशन ) यांनी घेवून सौ गायकवाड यांची निवड केली आहे यावेळी श्री दत्तात्रय ढमाळ ( खजिनदार ) अॅड रफीक शेख संकेत चव्हाण उपस्थित होते
यावेळी या कार्यक्रमात सौ हर्षदा शाम सोनावणे यांची ( वाई तालुका अध्यक्षपदी ) तर मानसी गणेश वाडकर यांची ( वाई तालुका सचिव ) पदी निवड करण्यात आली आहे कार्यक्रमाचे सुत्रसंचलन मानसी वाडकर यांनी केले व सर्वांचे आभार सौ हर्षदा सोनावणे यांनी मानले कार्यक्रमास अनेक पदाधिकारी उपस्थित होते

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

anandi atta chakki V
सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला