नायगाव ते वाई क्रांतिज्योत आणून स्वयंसेवकांचे सावित्रीबाईंना अभिवादन

किसन वीर मधील एन.एस. एसचा उपक्रम

 वाई : जानेवारी हा ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांचा जन्मदिवस हा जयंतीसोहळा प्रत्येकजण वेगवेगळ्या पध्दतीने साजरा करीत असतो. किसन वीर च्या एन.एस.एस. विभागाने १९२ वा जयंती सोहळा साजरा करताना महाविद्यालयाची परंपरा अबाधित ठेवून नायगाव या सावित्रीबाईंच्या जन्मगावातून वाईपर्यंत क्रांतिज्योत आणण्याचे ठरविले. त्यासाठी महाविद्यालायाचे प्राचार्य डॉ. गुरूनाथ फगरे यांचे खंबीर पाठबळ मिळाले. प्रकल्प अधिकारी डॉ. अंबादास सकट व डॉ. संग्राम थोरात यांनी त्याचे नेटके नियोजन केले.
समाजसुधारणेच्या कार्यात संपूर्ण आयुष्य समर्पण करणा-या  सावित्रीबाई फुले यांनी मुलींना शिक्षण देण्यासाठी अंगावर दगड-गोटे झेलले याची जाणीव आजच्या एन.एस.एस. स्वयंसेवकांनाही असल्याने क्रांतिज्योत धावत आणण्यास सज्ज असल्याचे त्यांनी सांगितले. ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांनी स्त्रियांचे शोषण, अस्पृश्यता, अंधश्रद्धा आणि स्त्री शिक्षणासाठी केलेला संघर्ष त्यांच्यासाठी प्रेरणादायी असल्याचा मानस सर्व सहभागी स्वयंसेवकांनी बोलून दाखविला व नायगाव ते वाई क्रांतिज्योत आणताना मुलांच्या बरोबरीने मुलींनीही ज्योत घेऊन आपण सावित्रीच्या लेकी कुठेही कमी नसल्याचे सिद्ध केले.
क्रांतिज्योत महाविद्यालयात येताच प्राचार्य डॉ. गुरूनाथ फगरे, डॉ. भानुदास आगेडकर, डॉ. शिवाजी कांबळे यांनी जोरदार स्वागत केले. डॉ. मंजूषा इंगवले व सर्व महिला प्राध्यापकांनी क्रांतिज्योत महाविद्यालय परिसरात फिरवली व सुशोभित रांगोळी काढून महाविद्यालयाच्या दर्शनी भागात ज्योत ठेवली.
याप्रसंगी एन.एस.एसच्या स्वयंसेवकांनी सावित्रीबाईंच्या जीवनातील वेगवेगळ्या प्रसंगांवर व त्यांच्या व्यक्तिमत्वावरील विविध पैलूंवर प्रकाश टाकणारी भीत्तीपत्रके तयार केली होती. त्याचे अनावरण प्राचार्यांच्या हस्ते करण्यात आले. क्रांतिज्योत आणण्यासाठी कला विभागाचे उपप्राचार्य प्रा. डॉ. सुनील सावंत, जयवंत खोत, डॉ. अरुण सोनकांबळे, स्वयंसेवक ऋृचा देशमुख, रसिका व्याहळीकर, सानिका सणस, प्रतिक्षा पार्टे, अक्षता वाडकर, प्राची काळे, ऋृचिता सोंडकर, ऐश्वर्या साळुंखे, संकेत दळवी, संतोष राजपुरे व सुयश पार्टे यांचे सहकार्य लाभले.

आम्हाला जोडण्यासाठी
सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला
मुख्यमंत्री पदी एकनाथ शिंदे यांची घोषणा होताच गोव्यात बंडखोर आमदारांचा नाचीन आनंद व्यक्त