ठोसेघर येथे अल्पवयीन युवकाकडून दगडाने ठेचून खून.
Satara News Team
- Fri 26th Apr 2024 08:19 pm
- बातमी शेयर करा

ठोसेघर : दारू पिऊन शिवीगाळ करत दमदाटी करत असल्याने चिडून जाऊन सुरेश विठ्ठल जाधव वय 45 राहणार ठोसेघर तालुका सातारा. यांचा अल्पवयीन मुलाने खून केला या घटनेत लाकडी दांडक्याने मारहाण करत डोक्यात दगड घातल्याचे समोर आले आहे ही घटना बुधवारी मध्यरात्रीच्या सुमारास घडली
अधिक माहिती अशी सुरेश जाधव हे गवंडी म्हणून तसेच पवनचक्कीवर काम करत होते. मूळचे ते ठोसेघर परिसरातील मायणी येथील आहेत. त्यांना दारूचे व्यसन होते दारू पिल्यानंतर ते शिवेगाळ दमदाटी करत होते. खून करणाऱ्या मुलालाही वेळोवेळी शिवीगाळ दमदाटी देत होते त्यामुळे तो घाबरून व चिडून होता. बुधवारी पुन्हा या दोघांमध्ये वादावादी झाली हा वाद एवढा विकोपाला गेला की त्यातून अल्पवयीन मुलाने दांडक्याने व दगडाने मारहाण करत सुरेश जाधव यांना रक्तबंबाळ केले .
सदरची माहिती मिळाल्यानंतर सातारा तालुका पोलीसांनी घटनास्थळी धाव घेतली. घटनास्थळी रक्ताचा सडा पडला होता. पोलीस राजेंद्र वंजारी ,राजू शिर्के ,संदीप करणे, वायदंडे ,शिवाजी डफळे यांचे पथक तयार करण्यात आले. संशयताची माहिती घेऊन त्यानुसार तात्काळ एकाला ताब्यात घेतले असता तो मुलगा अल्पवयीन असल्याचे समोर आले पोलीस संशयित मुलाकडे प्राथमिक चौकशी करत आहेत. दरम्यान घटनेचा पंचनामा करून. दरम्यान याप्रकरणी सातारा तालुका पोलीस ठाण्यामध्ये अल्पवयीन मुलावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन बाल न्यायालयात हजर केले आहे.
स्थानिक बातम्या
सातार्यातील कॅफेत १३ वर्षांच्या मुलीवर अत्याचार; पोलिसांकडून छापे, सहा जणांवर गुन्हा दाखल
- Fri 26th Apr 2024 08:19 pm
स्टेरॉइड’प्रकरणात मुख्य सूत्रधाराला मुंबईतून अटक, सातारा शहर पोलिसांची कारवाई
- Fri 26th Apr 2024 08:19 pm
चुहा नही ये तो शेर है... शिवानी ताई प्रीतम कळसकर..
- Fri 26th Apr 2024 08:19 pm
मारहाण दमदाटी शिवीगाळ प्रकरणी मोगराळे येथील सातजणांविरोधात गुन्हा दाखल.
- Fri 26th Apr 2024 08:19 pm
तब्बल एक कोटी ९१ हजार रुपयांची बनावट विदेशी दारू जप्त करत दारू तस्करांच्या मुसक्या आवळल्या
- Fri 26th Apr 2024 08:19 pm
संबंधित बातम्या
-
सातार्यातील कॅफेत १३ वर्षांच्या मुलीवर अत्याचार; पोलिसांकडून छापे, सहा जणांवर गुन्हा दाखल
- Fri 26th Apr 2024 08:19 pm
-
म्हसवड पोलिसांचा वाळू माफियांना पुन्हा एकदा दणका..
- Fri 26th Apr 2024 08:19 pm
-
स्टेरॉइड’प्रकरणात मुख्य सूत्रधाराला मुंबईतून अटक, सातारा शहर पोलिसांची कारवाई
- Fri 26th Apr 2024 08:19 pm
-
वाईत गौण खनिजाची राजरोस लुट.... नंबर नसणारे हायवा शहरातून फिरतात -महसुल प्रशासन संशयाच्या भोवऱ्यात
- Fri 26th Apr 2024 08:19 pm
-
म्हसवड पोलिसांचा वाळू माफियाना दणका...
- Fri 26th Apr 2024 08:19 pm
-
मारहाण दमदाटी शिवीगाळ प्रकरणी मोगराळे येथील सातजणांविरोधात गुन्हा दाखल.
- Fri 26th Apr 2024 08:19 pm
-
तब्बल एक कोटी ९१ हजार रुपयांची बनावट विदेशी दारू जप्त करत दारू तस्करांच्या मुसक्या आवळल्या
- Fri 26th Apr 2024 08:19 pm
-
फलटण तालुक्यात वाळू आणि मातीचा अवैध उपसा.
- Fri 26th Apr 2024 08:19 pm