साडेतीन महिन्यांत जरंडेश्वर कारखाना ताब्यात घेणार : आ.महेश शिंदे

सातारा : एक हजार कोटींची बेनामी संपत्ती जमा करून साडेतीन महिन्याच्या आत जरंडेश्वर कारखाना ताब्यात घेणार असल्याचा दावा आमदार महेश शिंदे यांनी केला आहे. स्वर्गीय यशवंतरावांचे पाईक असणाऱ्यांच्या चेल्यानी जरंडेश्वर कारखान्याच्या सभासदांना गुलाम बनवण्याचे काम चालू केला असल्याचा आरोप करत आ. महेश शिंदेंनी पवार कुटुंबावर निशाणा साधला आहे.
 कोरेगाव तालुक्यातील तडवळे येथे ज्येष्ठ कार्यकर्ते बाळासाहेब साळुंखे यांच्यासह 200 कार्यकर्त्यांनी आमदार महेश शिंदे गटात प्रवेश केला. यावेळी भाषण करताना महेश शिंदे यांनी कोरेगाव येथील जरंडेश्वर कारखान्याची एक हजार कोटींची बेनामी संपत्ती जमा करून साडेतीन महिन्याच्या आत जरंडेश्वर कारखाना ताब्यात घेणार असल्याचे संकेत कोरेगावचे शिवसेनेचे आमदार महेश शिंदे यांनी दिले आहेत..
स्वर्गीय यशवंतरावांचे पाईक असणाऱ्यांच्या चेल्यानी जरंडेश्वर कारखान्याच्या सभासदांना गुलाम बनवण्याचे काम चालू केला आहे. रयत शिक्षण संस्था आणि जरंडेश्वर कारखाना तुम्ही चोरला आहे. हे जर तुम्ही सोडणार नसाल तर ती घ्यायची ताकद या सातारा जिल्ह्यातील प्रत्येक युवकाच्या मनगटात आणण्याची ताकद महेश शिंदे देणार हे लक्षात ठेवा, असे सांगत आमदार महेश शिंदेंनी पवार कुटुंबावर निशाणा साधला आहे. 

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

anandi atta chakki V
सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला