वंचित मुलांच्या चेहऱ्यावरील आनंद हाच दिवाळीचा परमानंद : संदीप राक्षे

 पुसेगाव : आदिवासी समाजाचे जीवन म्हणजे जीवनात कायम अंधारच, "ना शिक्षण ना जगाची माहिती" आपल्याच मिळालेल्या जीवनात आनंद शोधणारी जमात आज त्याच मुलांना गेली अकरा वर्षापासून एक निर्धार केला आहे की वंचित परिवाराला व त्याच्या मुलांना दिवाळी फराळ व नवीन कपड्याचे वाटप करायचे हा त्यांचा निर्धार म्हणजेच वंचित मुलांच्या चेहऱ्यावरील आनंद हाच माझा दिवाळीचा परमानंद असे मत संदीप राक्षे यांनी व्यक्त केले आहे.
.   दीपावली म्हणजे सणांची सम्राज्ञी हा सण आपल्याला दुःखातून आनंदाकडे, नैराश्यातून उत्साहाकडे आणि अंधकारातून प्रकाशाकडे नेणारा असतो. दीप म्हणजे दिवा, "दिप्यते दीपयती वा  स्व परं येती " अर्थात जो स्वतः प्रकाशतो किंवा दुसऱ्याला प्रकाशित करतो तो दीप " सर्व सामान्यांच्या जीवनात येथे कधीतरी दिवाळी, भौतिक सुखापासून, दूर जगापासून कितीतरी पावले दूर असे जंगलात राहणाऱ्या आदिवासी कुटुंबाच्या आयुष्यात कुठून येणार दिवाळी? या व अशा थोर उदात्त हेतूने संदीप राक्षे यांनी गेल्या अकरा वर्षांपासून एक निर्धार केला आहे की, अतिशय दुर्गम भागात जाऊन वंचित परिवाराला व त्यांच्या मुलांना दिवाळी फराळ व नवीन कपड्याचे वाटप करायचे, यापूर्वी त्यांनी तोरणमाळ, नंदुरबार,चिखलदरा, अमरावती येथील जंगलात राहणाऱ्या आदिवासी भागात जाऊन हा उपक्रम राबवला आहे. यावर्षी नगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील रतनवाडी भागात जाऊन तेथील सरपंच संपतराव झाडे यांच्यासोबत घेऊन आदिवासी पाड्यावर जाऊन कपडे व दिवाळी फराळाचे वाटप केले. यावेळी सिनेमॅटोग्राफर मारुती ताईनाथ हे सोबत होते. आदिवासीचे जीवन म्हणजे जीवनात कायम अंधारच,'ना शिक्षण ना जगाची माहिती' आपल्याच मिळालेल्या जीवनात आनंद शोधणारी जमात जंगलात फिरून जी काही जडीबुटी मिळते त्यावर किंवा मिळेल त्यात जागेत नाचणीचे पीक घेऊन आपला उदरनिर्वाह करीत "ना आशा, ना नाकांक्षा" अंग झाकायला मिळेल इतका एखादा कपडा तो पण धुवून पुन्हा घालायचा अशा जीवन व्यथित  करणाऱ्या आदिवासी पाड्यात जाऊन दिवाळी फराळाचे व कपड्याचे वाटप करताना, त्या मुलांच्या चेहऱ्यावरील आनंद पाहून माझी दिवाळी साजरी झाल्याचा अत्यानंद मला झाला असे संदीप राक्षे यांनी खास आवर्जून सांगितले.

आम्हाला जोडण्यासाठी
सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला
मुख्यमंत्री पदी एकनाथ शिंदे यांची घोषणा होताच गोव्यात बंडखोर आमदारांचा नाचीन आनंद व्यक्त