आम्ही त्या आरोपांना आम्ही भिक घालत नाही...कोणत्याही चौकशीला सामोरे जायला तयार आहे....श्री.छ. खा.उदयनराजे यांचा आ.शिवेंद्रसिंहराजे यांच्यावर पलटवार

सातारा : आमदार शिवेंद्रसिंहराजे यांनी सातारा पालिकेने आकारलेल्या घरपट्टीच्या अनुषंगाने शुक्रवारी आक्रमक भूमिका घेत सातारा विकास आघाडीने साताऱ्याची लूट केल्याचा आरोप केला होता. त्याला उदयनराजे यांनी जल मंदिर येथे पत्रकार परिषद घेऊन जोरदार प्रत्युत्तर दिले.

सगळी सोंगे आणता येतात पैशाचे सोंग आणता येत नाही. सुविधा हव्यात महसूल मिळायला हवा. काही महाभाग घरपट्टीच भरत नाही मग सुविधा मिळणार कशा ? घरपट्टीच्या संदर्भाने टीका करणारे विद्वान असावेत, काही झाले की सातारा विकास आघाडीने लूट केली अशी टीका करायची. कारण नसताना लोकांमध्ये संभ्रम करण्यासाठी त्यांनी बिनबुडाचे आरोप केले आहेत मात्र आम्ही त्या आरोपांना  भिक घालत नाही,  अशी जोरदार टीका खासदार उदयनराजे भोसले यांनी आमदार शिवेंद्रसिंहराजे यांच्यावर केली.

 


अगदी ईडीच्या चौकशा लावा. कोणत्याही चौकशीला सामोरे जायला तयार

ते पुढे म्हणाले, साविआ का स्थापन झाली आहे ती लोकांना सुविधा पुरवण्यासाठी, तुमच्याकडे एकहाती सत्ता होती. तुम्ही काम केले नाही म्हणूनच आम्हाला भूमिका घ्यावी लागली. सातारकरांचा आमच्यावर विश्वास आहे त्याला आम्ही पात्र ठरलो आहोत. हद्दवाढीसाठी आम्ही १२४ कोटी रुपयांचा निधी आणला. मात्र पैशाचे सोंग आणता येत नाही सुविधा हव्या असतील घरपट्टी द्यावी लागेल . हद्दवाढीच्या भागात मुख्याधिकाऱ्यांना कॅम्प लावायला सांगितले आहे . घरपट्टीची बिले तेथे तपासून भरून घेतली जातील. काही लोक नुसतेच बिनबुडाचे आरोप करतात मात्र आरोप करताना तीन बोटे आपल्याकडे असतात मात्र अशा आरोपांना आम्ही भीक घालत नाही असे ते म्हणाले. काही लोक पालिकेच्या कारभाराची चौकशी लावणार असतील तर अगदी ईडीच्या चौकशा लावा. कोणत्याही चौकशीला सामोरे जायला तयार आहे, असे उदयनराजे म्हणाले.

 

वाघनखे इग्लंडला पाठवण्यिात आली तेव्हा मी नव्हतो

छत्रपती शिवरायांच्या वाघनखांच्या संदर्भाने ते म्हणाले या विषयावर काही तज्ञांनी पुरावे दिलेले आहेत त्यामुळे मी काही या विषयावर जास्त बोलणार नाही मात्र वाघनखे इग्लंडला पाठवण्यिात आली तेव्हा मी नव्हतो अशी मश्किलिी उदयनराजे यांनी केली. मराठा क्रांती मोर्चाची जालना येथे शनिवारी सभा होत आहे त्या संदर्भाने बोलताना उदयनराजे म्हणाले, मराठा आरक्षण सभेला मी जाणार नाही. जातपात मी मानत नाही. दर दहा वर्षावर आरक्षण दिले पाहिजे. त्यावेळच्या राज्यकर्त्यांची चुकी आहे, असे ठाम मत आहे. जातनिहाय लोकजनगणना झाली पाहिजे. तसेच आर्थिक निकषावर आरक्षणाचा विचार व्हावा असे ते म्हणाले .

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

anandi atta chakki V
सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला