गावोगावच्या सरपंचापेक्षा नागरिक कसा असावा.? नागरिकांनी आत्मपरीक्षण करण्याची गरज

पुसेगाव - महाराष्ट्रातील प्रत्येक गावागावांमध्ये  नागरिका मध्ये चर्चा असतात.सरपंच असा असावा, सरपंच तसा असावा.परंतु गावातील राहणारा नागरिक कसा असावा.हे मात्र कुणीच बोलत नाही. सरपंच कसा असावा यापेक्षा नागरिक कसा असावा याचे आत्मपरीक्षण करण्याची गरज आजच्या परिस्थितीला निर्माण झाली आहे. यालेखांच्या आधारे बहूतांश नागरिकांचा गावागावातील घेतलेला आढावा आपणास निश्चितच विचार करावयास लावणार आहे. आपण आज प्रत्येक गावामध्ये जातो. जे आपणाला निदर्शनास येते ते आपल्यापुढे सादर करण्याचा प्रयत्न करीत आहे. ही सत्य परिस्थिती आहे. " हे सत्य आहे पण कटू आहे "  गावात नागरिक रस्त्यावर गुरे -ढोरे, शेळ्या ,बांधतात.रस्त्यावर खतासाठी खड्डे करुन खत सुध्दा टाकतात.रस्त्यावर इंधनकाडी ठेवतात.घरातील सांडपाणी जाणूनबुजून रस्त्यावर सोडतात.. गावातील मुख्य रस्त्यावरून व अंतर्गत रस्त्यावरून मोटरसायकल सुसाट चालवतात व चार चाकी वाहने रस्त्यावर लावतात लोकांना रस्त्यावरून ये -जा करण्यासाठी अडथळे निर्माण करतात ही एक मोठी आपल्या गावची शोकांतिका आहे.आपले गाव चांगले ठेवणे हे सरपंचाच्या हाती नसून ते आपल्या हाती आहे.कोणताही सरपंच करा ते तुम्हच्या घरा समोरील साफसफाई स्वतः नाही करुन देणार.सरपंच धार्मिक स्थळासाठी निधी आणुन इमारत उभी करु शकतो.परंतु त्या परिसरातिल रस्त्यावर गुरे -ढोरे बांधणे रस्त्यावर उकिरडा टाकून होणारी वाईट परिस्थिती टाळू शकत नाही.कारण त्यांना तुम्हच्याशी वाईट होऊन राजकारण सोडायचे नसते. आपण जर असाच वागत राहीलास इंद्रदेव जरी सरपंच केला तरी गावाचा खरा विकास होणार नाही. शेवटी "सरपंच" हे पद मर्यादित कालावधीसाठी आहे. "नागरिक "हे पद जीवनमान असेपर्यंत आहे.
आणि आपण म्हणतो असा सरपंच पाहिजे ,तसा सरपंच पाहिजे. आणि नागरिक कसा पाहिजे .हे आपण विचार केला काय ? स्वतः पासून सुरुवात करा सुज्ञ नागरिक बना.आपल्या पासून दुसऱ्याला त्रास होणार नाही याची दक्षता घ्या.आणि आपलं गावं आदर्श बनवा. जेष्ठ लोकांचे सहकार्य घ्या. वादविवाद टाळा .ज्यांना ज्या विषयाचे ज्ञान आहे.त्यांनी स्वतः हून पुढे या गावामध्ये विकास कामे करण्यासाठी सहकार्य करा. गावच्या विकासाच्या दृष्टीने आपणाला माहिती असणाऱ्या किंवा सुचणाऱ्या नवनवीन कल्पना ग्रामपंचायतीस सांगा. ग्रामपंचायत सुध्दा तुम्हाला मान सन्मान देईल . प्रथमदर्शनी गावच्या हिताच्या असतील तर त्यास प्राधान्य देईल .पदाधिकारी बदलून समस्या सुटत नाही.तर ती गावानी एकत्र येऊन सुटत असते.परंतु आत्ता प्रत्येक माणुस अभिमानी झाला.कुणी कुणा सोबत बोलायला तयार नाही.चांगल्या विचारांची देवाण -घेवाण नाही. प्रत्येकाला वाटते मला कोणाची गरज नाही ,प्रत्येकाला प्रत्येक माणुस वाईट वाटतो,तर मग चांगले कोण ? एकदा हा प्रश्न स्वतः डोके शांत ठेवून, डोळे झाकून, आत्मपरीक्षण करणे गरजेचे आहे. आणि या वरील गोष्टी सातत्याने नागरिकांनी अवलंबिल्या तर त्या गावचा कायापालट झाल्याशिवाय राहणारच नाही.

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

anandi atta chakki V
सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला