जिल्ह्यात १६ गावांत दुष्काळाच्या झळा
टँकरने पाणीपुरवठा सुरुSatara News Team
- Thu 23rd Jun 2022 08:55 am
- बातमी शेयर करा
सहा तालुक्यांतील १६ गावे व ३६ वाडी-वस्त्यांमध्ये पाणीटंचाई निर्माण झाली आहे. त्यामुळे प्रशासनामार्फत अद्यापही तेथे टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे.
सातारा : जून महिना संपत आला, तरी जिल्ह्यातील १६ गावांना टँकरद्वारे पाणीपुरवठा होत आहे. पावसाने दडी मारल्याने दुष्काळग्रस्त भागातील गावे व वाड्यावस्त्यांमध्ये पाणीटंचाई निर्माण झाली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील सहा तालुक्यांत एकूण १२ टॅंकर सुरू आहेत.
गेल्या वर्षी पाऊस चांगला झाल्याने एप्रिल महिन्यापर्यंत पाण्याची कुठलीही टंचाई निर्माण झाली नव्हती. मात्र, यंदा उष्णतेची लाट आल्याने पाण्याची पातळी खालावली गेली. त्यातच उन्हाळी पाऊस पाहिजे तेवढ्या प्रमाणात न झाल्याने दुष्काळी भागातील परिस्थिती अधिकच बिकट झाली. त्यामुळे जिल्ह्यातील काही तालुक्यात एप्रिल महिन्यापासून पाण्याचे टॅंकर सुरू करण्यात आले. सुरुवातीला पाणीपुरवठा करणाऱ्या टँकरची संख्या अधिक होती. मात्र, सद्यःस्थितीत टँकरची संख्या कमी करण्यात आली आहे.
दरम्यान, जून महिना उजाडला तरी पावसाने दडी मारली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील माण, वाई, पाटण, जावळी, सातारा व कऱ्हाड तालुक्यांतील सहा शासकीय व सहा खासगी टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. यामध्ये माण तालुक्यात सहा टँकर, वाई दोन, पाटण एक, जावळी दोन, सातारा दोन व कऱ्हाड तालुक्यात दोन असे बारा टँकर सुरू आहेत. सहा तालुक्यांतील १६ गावे व ३६ वाडी-वस्त्यांमध्ये पाणीटंचाई निर्माण झाली आहे. त्यामुळे प्रशासनामार्फत अद्यापही तेथे टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे.
#satara#collectoroffice
स्थानिक बातम्या
पोलीस अधीक्षक निखिल पिंगळेंनी पदभार स्वीकारताच अवैध धंद्यांवर छापे ; १२ जणांवर गुन्हे
- Thu 23rd Jun 2022 08:55 am
राजीनाम्याचा लेटर बॉम्ब; साताऱ्यात शिंदे शिवसेनेत खळबळ
- Thu 23rd Jun 2022 08:55 am
अक्षय तृतीया विशेष : क्रांतिसूर्य महात्मा बसवेश्वर
- Thu 23rd Jun 2022 08:55 am
पुसेसावळी दुरक्षेत्र परिसरात अवैध धंद्यांचा 'अंधार' आणि उपनिरीक्षकांची 'सुपरसोनिक' नेत्रे?
- Thu 23rd Jun 2022 08:55 am
संबंधित बातम्या
-
परंपरागत शिवजयंती निमित्त फलटण येथे भव्य दुचाकी रॅली
- Thu 23rd Jun 2022 08:55 am
-
फलटण येथे शिवजयंती उत्सव जल्लोषात साजरा
- Thu 23rd Jun 2022 08:55 am
-
अक्षय तृतीया विशेष : क्रांतिसूर्य महात्मा बसवेश्वर
- Thu 23rd Jun 2022 08:55 am
-
महानुभाव पंथीयांच्या दक्षिण काशी फलटण येथे घोड्याची यात्रा उद्या उत्साहात संपन्न.
- Thu 23rd Jun 2022 08:55 am
-
तळदेव येथे सामाजिक समरसता जनजागृती बैठक उत्साहात संपन्न
- Thu 23rd Jun 2022 08:55 am
-
फलटण शहरातील दैनंदिन पाणीपुरवठ्यासाठी नगराध्यक्ष समशेर सिंह नाईक निंबाळकर ॲक्शन मोडवर
- Thu 23rd Jun 2022 08:55 am










