राजवंश आठवडा बाजार संघटनेच्या व्यापाऱ्यांना संस्थापक खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या हस्ते ओळखपत्रांचे वितरण.
संघटनेचे अध्यक्ष जयवंत पवार, उपाध्यक्ष मुकुंदराज काकडे यांच्यासह मोठ्या संख्येने व्यापारी बांधव उपस्थित.Satara News Team
- Sun 27th Aug 2023 02:54 pm
- बातमी शेयर करा
सातारा : गेली ५ वर्षे गोरगरीब आठवडा बाजार करणाऱ्या व्यापाऱ्यांच्या हितासाठी उघडण्यात आलेली संघटना म्हणून नावारूपाला आलेली राजवंश आठवडा बाजार संघटना व या संघटनेचे संस्थापक खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या हस्ते ओळखपत्रांचे वितरण आज करण्यात आले यावेळी मोठ्या प्रमाणावर जिल्ह्यातील आठवडा बाजार करणारे नागरिक उपस्थित होते.
राजवंश आठवडा बाजार संघटनेचे अध्यक्ष जयवंत पवार यांच्या माध्यमातून या संघटनेची मुहूर्तमेढ रोवण्यात आली व कोरोनाच्या कार्यकाळामध्ये अगदी गोरगरीब व्यापाऱ्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहिलेली संघटना म्हणून राजवंश आठवडा बाजार संघटनेकडे पाहिले जाते याच माध्यमातून काही दिवसांपूर्वी संघटनेतील एका व्यापाऱ्याचा आकस्मितरित्या मृत्यू झाला होता त्यावेळी संघटनेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष व सर्व पदाधिकाऱ्यानी मिळून संघटनेच्या माध्यमातून आपल्या बांधवाला आर्थिक मदत संघटनेच्या माध्यमातून केली व ही मदत संघटनेचे अध्यक्ष जयवंत पवार व पदाधिकाऱ्यांनी थेट त्यांच्या घरी जावून दिली त्यामुळे थोड्याफार का होईना संघटनेच्या माध्यमातून या आर्थिक मदतीमुळे त्या कुटुंबाला उदरनिर्वाह करता आला
अशाच पद्धतीने वेळोवेळी राजवंश आठवडा बाजार संघटनेच्या माध्यमातून गोरगरीब दिंनदलित बाजार करणाऱ्या नागरिकांसाठी लढणारी संघटना म्हणजे राजवंश आठवडा बाजार संघटनेकडे पाहिले जाते. संघटनेचे अध्यक्ष जयवंत पवार यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर संघटनेसाठी हिताची कामे केली जातात.
आज राजवंश आठवडा बाजार संघटनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांची व सदस्यांची ओळखपत्रे संघटनेचे संस्थापक असणारे खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले महाराज यांच्या हस्ते जलमंदिर पॅलेस येथे वितरण करण्यात आली या वितरणावेळी मोठ्या प्रमाणावर जिल्ह्यातील आठवडा बाजार करणारे गोरगरीब व्यापारी उपस्थित होते यावेळी खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले महाराज म्हणाले की, संघटनेच्या आपण सदैव पाठीशी उभे आहोत व यावेळी सर्व व्यापाऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या व यावर लवकरात लवकर तोडगा काढण्याचे आश्वासन खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले महाराज यांनी दिले यावेळी संघटनेचे अध्यक्ष जयवंत पवार, उपाध्यक्ष मुकुंदराज काकडे, सचिव अर्जुन आवटे, खजिनदार गणेश कुर्ले, संचालक आण्णा कांबळे, संभाजी पिसाळ, दिलीप चव्हाण, मंगेश जाधव, जालिंदर शिंदे गणेश नवघणे, संतोष ठिगळे, अजय कुर्ले, अमोल खरात, रेखा कारंडे, भारती जाधव, शारदा साळुंखे, रंजना साळुंखे, संगीता साळुंखे, रेखा साळुंखे, लक्ष्मी साळुंखे, सुनिता साळुंखे, पमुबाई माने, नगरसेवक राजेंद्र वैराट, करण पंडित, सिद्धार्थ पाटणकर, नंदू धोंगडे तसेच राजवंश बाजार संघटनेचे सर्व पदाधिकारी व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.
स्थानिक बातम्या
कुसुंबी गणात मंत्री शिवेंद्रराजेंचा करिष्मा चालणार
- Sun 27th Aug 2023 02:54 pm
फलटण तालुक्यात शिवसेना एकनाथ शिंदे गट आता होणार प्रबळ दावेदार.
- Sun 27th Aug 2023 02:54 pm
फलटण पंचायत समिती सदस्य पदासाठी सांगवी गणातून सौ .सारिका संजय सोडमिसे प्रबळ दावेदार.
- Sun 27th Aug 2023 02:54 pm
शिक्षण प्रसारक संस्थेचा पूरग्रस्त विद्यार्थ्यांना मदतीचा हात..
- Sun 27th Aug 2023 02:54 pm
फलटण शहरचे पोलीस निरीक्षक हेमंतकुमार शहा यांची तडकाफडकी बदली
- Sun 27th Aug 2023 02:54 pm
संबंधित बातम्या
-
फलटण तालुक्यात शिवसेना एकनाथ शिंदे गट आता होणार प्रबळ दावेदार.
- Sun 27th Aug 2023 02:54 pm
-
फलटण पंचायत समिती सदस्य पदासाठी सांगवी गणातून सौ .सारिका संजय सोडमिसे प्रबळ दावेदार.
- Sun 27th Aug 2023 02:54 pm
-
शिक्षण प्रसारक संस्थेचा पूरग्रस्त विद्यार्थ्यांना मदतीचा हात..
- Sun 27th Aug 2023 02:54 pm
-
उपमुख्यमंत्री अजित पवार आणि धिरेंद्रराजे खर्डेकर यांची राजकीय भेट
- Sun 27th Aug 2023 02:54 pm
-
औंध महाविद्यालयात स्पर्धा परीक्षा विषयावर कार्यशाळा संपन्न.
- Sun 27th Aug 2023 02:54 pm
-
फलटण येथील गणेश मूर्ती विटंबनेप्रकरणी संबंधितावर गुन्हा नोंद करा .
- Sun 27th Aug 2023 02:54 pm









