पोलीस कोठडीदरम्यान, माझा विनयभंग झाला, मला मारहाण झाली.अंगावर विषारी काळा रंग टाकला.. अभिनेत्री केतकी चितळेचा गंभीर आरोप

इतकं सोसल्यानंतरही मी हसत बाहेर आले कारण मी तुरुंगातून बाहेर आले होते, पण मी केवळ जामिनावर बाहेर आले आहे, हे लक्षात घ्यायला हवं. माझी लढाई अजून संपलेली नाही.

सातारा न्यूज मुंबई : राज्यातील ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यावर आक्षेपार्ह शब्दात टिपण्णी करणारी अभिनेत्री केतकी चितळे ही अटक होऊन जामीनावर सुटकाही झाली आहे. पण पोलीस कोठडीत आपल्याला अनेक गंभीर गोष्टींचा सामना करावा लागला असा आरोप तिनं नुकताच केला आहे. इंडिया टुडेशी बोलताना तिनं आपल्या मारहाण विनयभंग झाल्याचं म्हटलं आहे
केतकी म्हणाली, तुरुंगात असताना मला मजबूत राहण गरजेचं होतं. कारण, एकतर मला बेकायदा पद्धतीनं माझ्या घरातून ताब्यात घेण्यात आलं. बेकायदापद्धतीनं कुठलंही वॉरंट, नोटीस न देता मला तुरुंगात डांबण्यात आलं. पण मला माहिती होतं की, मी काहीही चुकीचं केलेलं नाही त्यामुळं मी या सर्व गोष्टींना सामोर जाणार. पण पोलीस कोठडीदरम्यान, माझा विनयभंग झाला, मला मारहाण झाली. तसेच काही तरुणांनी माझ्या अंगावर विषारी काळा रंग टाकला. कळनमोली पोलिसांकडून ठाणे पोलिसांकडे सुपूर्द करत असताना हा प्रकार घडला.
अशा प्रकारच्या अनेक अत्याचाराच्या घटना माझ्यासोबत घडल्या, अशा प्रकारे भारतात बेकायदा पद्धतीनं अत्याचार करण्यात येत असल्याचंही तिनं आरोप करताना म्हटलं आहे. पण इतकं सोसल्यानंतरही मी हसत बाहेर आले कारण मी तुरुंगातून बाहेर आले होते, पण मी केवळ जामिनावर बाहेर आले आहे, हे लक्षात घ्यायला हवं. माझी लढाई अजून संपलेली नाही.
केतकी चितळे २९ दिवस पोलीस कोठडीत होती. तिच्यावर राज्यात विविध पोलीस स्टेशनमध्ये २२ एफआयआर दाखल करण्यात आले होते. यांपैकी एका गुन्ह्यातून तिला जामीन मिळाला आहे, अद्याप इतर २१ गुन्हे कायम असल्याचं तिनं स्वतः यावेळी सांगितलं.

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

anandi atta chakki V
सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला