होमाई कुपर फाउंडेशन तर्फे श्रीपतराव पाटील हायस्कूल मधील विद्यार्थ्यांसाठी ग्रंथसंपदा भेट__

सातारा : शिक्षण प्रसारक संस्था संचलित श्रीपतराव पाटील हायस्कूल मधील विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची गोडी वृद्धिंगत व्हावी या उद्देशाने 'कूपर कार्पोरेशन प्रायव्हेट लिमिटेड' चे H.R. माननीय श्री नितीन देशपांडे सर यांच्या सहकार्याने श्रीपतराव पाटील हायस्कूल मधील विद्यार्थ्यांसाठी 400 ग्रंथ भेट देण्यात आले व ग्रंथांची निगा ठेवण्यासाठी कपाट ही सप्रेम भेट देण्यात आले.   कार्यक्रमासाठी  कंपनीचे प्रतिनिधी म्हणून उपस्थिती दर्शवलेले माननीय श्री खटावकर साहेब व माननीय श्री खरे साहेब यांनी  आपल्या भाषणातून वाचनाचे महत्त्व विद्यार्थ्यांना पटवून दिले.तसेच कूपर उद्योग समूहाला यशस्वी शंभर वर्षे पूर्ण झाले बद्दल वर्षभर अनेक समाज उपयोगी उपक्रम राबवत असलेची माहिती दिली.


तसेच शिक्षण प्रसारक संस्थेचे विद्यमान सचिव माननीय श्री तुषार पाटील सर यांनी देखील कूपर कुटुंबीय यांनी नेहमीच करंजे गावाला मदत केल्याचा तसेच त्यांनी करंजे येथील वैकूंठ  अंत्यसंस्कार मंडळासाठी फार मोठी आर्थिक मदत केल्याचा उल्लेख करून विद्यार्थ्यांना पुस्तके वाचण्यासाठी प्रेरित केले व कूपर उद्योग समूहाचे सहकार्याबद्दल धन्यवाद ही दिले.या कार्यक्रमासाठी शिक्षण प्रसारक संस्थेचे उपाध्यक्ष माननीय श्री  किर्दत सर ,श्री जगताप सर ,संस्था सचिव माननीय श्री तुषार पाटील सर, संचालिका सौ. यादव मॅडम ,माजी विद्यार्थी गणेश किर्दत, विद्यालयातील शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला
मुख्यमंत्री पदी एकनाथ शिंदे यांची घोषणा होताच गोव्यात बंडखोर आमदारांचा नाचीन आनंद व्यक्त