हर घर तिरंगा तर मग हर गरीब के घर नोकरी का नाही ?
आर्मि मध्ये दर वर्षी ७५००० होणारी भरती रद्द करुन अग्निपथचे गाजर का ?सागर पाटील
- Fri 12th Aug 2022 05:31 am
- बातमी शेयर करा
सातारा: देशाचा अमृत महोत्सव साजरा होत असताना देशाच्या प्रत्येक नागरिकाला अभिमान वाटणं साहजिकच आहे. परंतु ज्यांच्या पाचवीला दारिद्र्य पूजलय, ज्यांना झेंडा लावायला घर नाही, ज्यांनी रस्त्यावरच संसार थाटलाय, जे भूमिहीन आहेत अशा प्रत्येक गरिबाला जर नोकरी देऊन स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा केला असता तर ते स्वातंत्र्यासाठी बलिदान दिलेल्या हुतात्म्यांना अभिवादन ठरलं असतं असं प्रतिपादन पुरोगामी संघर्ष परिषदेच्या महिला आघाडीच्या वरिष्ठ राज्यउपाध्यक्षा सौ. सुनीता खटावकर यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात केले आहे.प्रसिद्धी पत्रकात सौ. खटावकर यानी पुढे म्हटले आहे की, देशांमध्ये दरवर्षी 75 हजार आर्मी मध्ये ग्रामीण भागातील मुलांना संधी दिली जायची परंतु केंद्र सरकारने कोरोनाच्या नावाखाली ही भरती पन्नास हजारावर आणून केलीच नाही आणि इथून पुढे करतील की नाही याबद्दल शंका असून अग्निपथचे गाजर दाखवून पूर्णपणे खाजगीकरणाकडेच वाटचाल केली असल्याची खंत व्यक्त केली असून यापुढे आर्मी भरतीची तातडीने कार्यवाही न झाल्यास पुरोगामी संघर्ष परिषद ज्या ज्या प्रमुख शहरांमध्ये मिलिटरीचे कँप आहेत त्या ठिकाणी आंदोलन करणार असल्याचे म्हटले आहे.
#satara
#bjpgovt
स्थानिक बातम्या
साताऱ्यात भुयारी गटार योजना वाऱ्यावर
- Fri 12th Aug 2022 05:31 am
विठ्ठलाच्या ओढीने धावणाऱ्या पावलांना बळ देणारा चरणसेवा उपक्रम
- Fri 12th Aug 2022 05:31 am
माथेरानला चौकशी समिती, महाबळेश्वरला मोकळे रान? शासनाच्या दुहेरी भूमिकेवर संताप
- Fri 12th Aug 2022 05:31 am
रयतराजच्या दणक्याने चड्डी बनियान डॉक्टर निलंबित तर दुसऱ्याची चौकशी.....
- Fri 12th Aug 2022 05:31 am
पालखी सोहळा स्वागतासाठी सातारा जिल्हा परिषद सज्ज- डॉक्टर प्रियाताई शिंदे
- Fri 12th Aug 2022 05:31 am
संबंधित बातम्या
-
हातगेवर विकास सेवा सोसायटीत कर्जप्रकरणी फसवणुकीचा आरोप; सहाय्यक पोलीस निरीक्षक, मेढा यांच्याकडे तक्रार दाखल
- Fri 12th Aug 2022 05:31 am
-
फलटण शहरातील अंतर्गत रस्त्यांसाठी प्रथमच मोठा भरीव 70 कोटींचा निधी.
- Fri 12th Aug 2022 05:31 am
-
नगराध्यक्ष समशेरसिंह यांनी उघड केला नगर परिषदेतील कर घोटाळा, अनेक वर्षापासून सुरू होता कर घोटाळा
- Fri 12th Aug 2022 05:31 am
-
पालखी सोहळा स्वागतासाठी सातारा जिल्हा परिषद सज्ज- डॉक्टर प्रियाताई शिंदे
- Fri 12th Aug 2022 05:31 am
-
कसं काय पाटील बर हाय का विधानसभेत जे ऐकले ते खर आहे का? ॲड. संदीप कांबळे.
- Fri 12th Aug 2022 05:31 am












