आरळेतील बाप-लेकाला ऑनलाईन १ कोटीचा चुना शेअर मार्केटद्वारे आमिष : चौघांवर पोलिसांत गुन्हा

सातारा :  शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवल्यास चांगला परतावा मिळेल, असे आमिष दाखवून आरळे, ता. सातारा येथील बाप-लेकाला चौघांच्या टोळीने १ कोटी ८ लाख ४० हजार ४५७ रुपयांचा चुना लावला. याप्रकरणी सातारा तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून, या घटनेने खळबळ उडाली आहे.
कलिस्ता शर्मा, देवशहा, किकी शहा, सिद्धार्थ सिंग (सर्व रा. माहीत नाही) यांच्याविरुद्ध स्वप्निल भानुदास (वय ३०, रा. आरळे, ता. सातारा) यांनी सातारा तालुका पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.


याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, ही घटना दि. १७ मार्च ते ५ जून २०२४ या कालावधीत ही घडली आहे. तक्रारदार युवकाला अनोळखी नंबरवरून फोन आला. अनोळखी व्यक्तीने ओळख सांगून शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवल्यास चांगला परतावा मिळेल, असे आमिष दाखवले. यासंबंधी अनोळखी व्यक्तीने इतर तीन सहकाऱ्यांना फोन करायला लावून तक्रारदारांचा विश्वास संपादन केला. वेळोवेळी फोन करून संशयितांनी माहिती दिल्याने ती खरी वाटली. त्यानुसार तक्रारदारांनी वेळोवेळी बँक खात्यावर तसेच ऑनलाईन प्रणालीद्वारे ४२ लाख ५० हजार रुपये पाठवले.एवढी मोठी रक्कम पाठवल्यानंतर त्याचा चांगला परतावा मिळत असल्याचे संशयित चौघांनी तक्रारदारांना सांगितले. तसेच आणखी रक्कम गुंतवल्यास अधिक फायदा होईल, असे पुन्हा दाखवले.त्यानुसार तक्रारदार युवकाने वडीलांच्या खात्यातील ६५ लाख ९० हजार ४५७ रुपये रक्कम वेळोवेळी बँक खाते, ऑनलाईनद्वारे पाठवले. अशाप्रकारे एकूण १ कोटी ८ लाख ४० हजार ४५७ रुपये रुपये संशयितांना पाठवले. संशयितांनी लवकरच चांगला परतावा मिळेल असे सांगितल्याने तक्रारदार त्याच्या खात्यात पैसे जमा होण्याची वाट पाहत होते. मात्र, पैसे जमा होत नव्हते. यासाठी वेळोवेळी फोन केल्यानंतर सुरुवातीला संशयितांनी पैसे जमा होतील, असे सांगून वेळ मारुन नेली. मात्र त्यानंतर पुन्हा तक्रारदार यांनी संपर्क केला असता ते प्रतिसाद देईना. यामुळे शंका आल्याने तक्रारदार यांनी अधिक माहिती घेतली असता फसवणूक झाल्याचे लक्षात आले. या घटनेने त्यांना धक्का बसला. यानंतर त्यांनी तात्काळ सातारा तालुका पोलिस ठाणे गाठून घडलेल्या घटनेची तक्रार दिली. तक्रारीवरुन पोलिसांनी चौघांविरुध्द गुन्हा दाखल केला.

 

तब्बल १ कोटी रुपयांची फसवणूक झाल्याने पोलिस तपासाकडे आता लक्ष लागले आहे. फसवणुकीचे प्रकार सर्रास वाढले आहेत. मात्र, संशयित परराज्यातील असल्याने पोलिस तपासावर मर्यादा येतात. लहान रक्कम असल्यानंतर पोलिस त्याकडे पाहत देखील नाहीत. यात मात्र मोठी रक्कम असल्याने पोलिसांची भिस्त तांत्रिक तपासावरच राहणार आहे. तालुका व सायबर पोलिस कसा तपास करणार? याकडे लक्ष लागले आहे.

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला
मुख्यमंत्री पदी एकनाथ शिंदे यांची घोषणा होताच गोव्यात बंडखोर आमदारांचा नाचीन आनंद व्यक्त