सातारा जिल्ह्यातील साखर कारखानदारांना ऊसाला चांगला दर देण्याशिवाय पर्याय नाही.
Satara News Team
- Thu 7th Dec 2023 05:35 pm
- बातमी शेयर करा
सातारा : कोल्हापूर जिल्ह्यातील साखर कारखानदारांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आंदोलन केले त्यांची दखल घेऊन मागील हंगामातील ऊस बिल १०० ते ५० रुपये शेतकऱ्यांना दिले या मध्ये राज्यांचे मुख्यमंत्री श्री.एकनाथ शिंदे दोन्ही उपमुख्यमंत्री, सहकार मंत्री, पालकमंत्री कोल्हापूर व जिल्हाधिकारी यांनी मिळून हा तोडगा काढला तो संपूर्ण साखर उद्योग करणारे सांगली व सातारा साठी सुध्दा लागू करण्यात यावा व या बाबत कारखानदारांनी स्पष्ट भूमिका मांडावी.
सातारा जिल्ह्यातील काही साखर कारखाने भाडे तत्त्वावर देण्यात आले आहेत त्यांना मुळ संस्थेला भाडे द्यावे लागते तरीही ते ३१५१ पहिली उचल देतात मग ज्यांना भाडे द्यावे लागत नाही त्यांचा दर सुध्दा मागील हंगामात व यंदा जवळपास एकच कसा .
सातारा जिल्ह्यातील फलटण, खटाव, खंडाळा हे आजपर्यंत कमी रिकव्हिरी झोन म्हणून जिल्ह्यात या अगोदर कमी दर देत होते ते कारखाने ३०५१ ते ३१५१ पहिली उचल जाहीर करतात म्हणजे नेहमीपेक्षा जवळपास २५० ते ३५० रुपये जास्त मग जास्त रिकव्हिरी असणारे कारखाने दरात मागे कसे .
सातारा जिल्ह्यातील ज्या कारखान्यांचे उपपदार्थ निर्मिती केली जात नाही ते कारखाने उपपदार्थ घेणार्या कारखान्यांच्या बरोबरीने दर देतात व पहिली उचल सुध्दा देतात मग इतर उत्पादने घेणारे कारखाने जास्त दर का देऊ शकत नाहीत.
मागील गळीत हंगामात महाराष्ट्रातील जवळपास सात ते आठ साखर कारखानदारांनी एफ आर पी पेक्षा ३५० ते ५०० रुपये जास्त दिले मग अनेक वर्षे या उद्योगात असणार्या कारखान्यांना हे का जमले नाही.
सातारा जिल्ह्यातील जावली,वाई, खंडाळा या भागातील असणारे साखर कारखाने शेतकऱ्यांसाठी आम्ही फार मोठे काहीतरी करत असल्याचा आव आणून लुटालूट चालविली आहे तिथला ऊस स्थानिक कारखान्यांना घातला तर २८०० रुपये टनाला व जरा लगत असलेल्या अजिंक्यतारा, शरयु , जरंडेश्वर या कारखान्याला ऊस घातला तर ३१०० ते ३१५१ रुपये मिळतात तर राजकारणासाठी खोटा कळवळा आनणारे स्थानिक शेतकऱ्यांचे पहिल्या उचलीलाच टनाला ३०० ते ३५० रुपये नुकसान करतात अजून पुढे जाऊन किती करणार व आता किसनवीर कारखाना यांनी २०० रुपये टनाला वाढ देऊन हे शेतकऱ्यांना दर देणे शक्य असताना का देत नव्हते व १००० कोटी च्या घोटाळ्याचे पुरावे जनतेला दाखवून सत्ता घेणारे आता हा दुसरा हंगाम चालू झाला तरीही कोणतीच कारवाई का करत नाहीत व शेतकऱ्यांचे अजून थकीत ऊस बिल करोडो रुपये कधी देणार.
सातारा जिल्ह्यात नव्याने सुरू होणारे कारखाने यांना अडथळा निर्माण करुन यांना सुध्दा शेतकऱ्यांना ज्यादा दर देण्याची इच्छा असताना देऊन देत नाहीत व आमच्या कार्यक्षेत्रातील ऊस गाळप करायचा नाही अशी नोटीस पाठवल्या त्यापेक्षा आपला आजपर्यंतच्या या उद्योगातील अनुभव पणाला लावून जास्त दर जाहीर करुन दराची स्पर्धा करुन ऊस घेऊन जावा नवीन सुरू होणारे कारखाने यांना स्पर्धा करता येत तर तुम्ही येवढं जूने अनुभवी तुम्हाला का जमत नाही याचे शेतकऱ्यांना उत्तर द्या.
खटाव तालुक्यातील वर्धन अग्रो हा कारखाना शेतकरी स्वता ऊस पोहच केला तर ४१११ रुपये टनाला दर देण्याचे जाहीर करतो मग सातारा जिल्ह्यातील इतर सर्व साखर कारखान्यांची दरातून तोंडणी वहातुक वजा केली तर सरासरी ८०० रुपये वजा करावे लागतील मग ४१११ मधून ८०० रुपये वजा केले तर ३३११ रुपये शिल्लक राहतात सातारा जिल्ह्यातील इतर साखर कारखानदार शेतकऱ्यांना कसे फसवतात हे याच कारखान्यांने शिध्द केले आहे.
सातारा जिल्ह्यातील सर्व ऊस उत्पादक शेतकऱ्यांना स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने जाहीर आवाहन करतो की दर पाहिजे असेल तर थोडे थांबा ऊस घालवण्याची घाई करू नका आता कुठे स्पर्धा चालू झाली आहे अजून चांगला दर मिळू शकतो आमचा प्रयत्न चालू आहेच फक्त तुमची साथ हवी.असे आवाहन स्वाभिमानी शेतकरीचे संघटनेचे जिल्हाध्यक्ष राजु शेळके यांनी केले आहे
स्थानिक बातम्या
कुसुंबी गणात मंत्री शिवेंद्रराजेंचा करिष्मा चालणार
- Thu 7th Dec 2023 05:35 pm
फलटण तालुक्यात शिवसेना एकनाथ शिंदे गट आता होणार प्रबळ दावेदार.
- Thu 7th Dec 2023 05:35 pm
फलटण पंचायत समिती सदस्य पदासाठी सांगवी गणातून सौ .सारिका संजय सोडमिसे प्रबळ दावेदार.
- Thu 7th Dec 2023 05:35 pm
शिक्षण प्रसारक संस्थेचा पूरग्रस्त विद्यार्थ्यांना मदतीचा हात..
- Thu 7th Dec 2023 05:35 pm
फलटण शहरचे पोलीस निरीक्षक हेमंतकुमार शहा यांची तडकाफडकी बदली
- Thu 7th Dec 2023 05:35 pm
संबंधित बातम्या
-
फलटण तालुक्यात शिवसेना एकनाथ शिंदे गट आता होणार प्रबळ दावेदार.
- Thu 7th Dec 2023 05:35 pm
-
फलटण पंचायत समिती सदस्य पदासाठी सांगवी गणातून सौ .सारिका संजय सोडमिसे प्रबळ दावेदार.
- Thu 7th Dec 2023 05:35 pm
-
शिक्षण प्रसारक संस्थेचा पूरग्रस्त विद्यार्थ्यांना मदतीचा हात..
- Thu 7th Dec 2023 05:35 pm
-
उपमुख्यमंत्री अजित पवार आणि धिरेंद्रराजे खर्डेकर यांची राजकीय भेट
- Thu 7th Dec 2023 05:35 pm
-
औंध महाविद्यालयात स्पर्धा परीक्षा विषयावर कार्यशाळा संपन्न.
- Thu 7th Dec 2023 05:35 pm
-
फलटण येथील गणेश मूर्ती विटंबनेप्रकरणी संबंधितावर गुन्हा नोंद करा .
- Thu 7th Dec 2023 05:35 pm









