महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेंतर्गत जिल्ह्यातील 1 लाख 77 हजार खातेदारांना प्रोत्साहनपर लाभ

सातारा :-  महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेंतर्गत नियमित कर्ज फेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50 हजार रुपये प्रोत्साहनपर लाभ दिला जातो. सातारा जिल्ह्यात या योजनेंतर्गत               1 लाख 77 हजार 165 खात्यांवर 628 कोटी 31 लाख रुपयांचा प्रोत्साहनभर लाभ देण्यात आला आहे, अशी माहिती जिल्हा उपनिबंधक मनोहर माळी यांनी दिली आहे.

    जिल्ह्यात एकूण 4 लाख 5 हजार 280 खाती नोंदणीकृत झाली आहेत. त्यापैकी 2 लाख 17 हजार 548 खात्यांना सहकार विभागाने विशिष्ठ खाती क्रमांक दिली आहेत. यामध्ये 2 लाख 14 हजार 816 खात्यांचे आधारप्रमाणीकरण पूर्ण करण्यात आले आहे. तर 2 हजार 723 खात्यांचे आधार प्रमाणिकरण करणे शिल्लक असून याबाबत संबंधित खातेदारांना कळविण्यात आले आहे. 

    शासनाने शेतकऱ्यांना कर्जमुक्त करण्याचे धोरण अवलंबले आहे. त्या अनुषंगाने कृषी व्यवसाय फायद्याचा करणे व शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावणे हा शासनाच्या धोरणाचा उद्देश आहे. यासाठी शासनाने शेतकऱ्यांचे दीड लाख रुपयांपर्यंतचे कर्ज माफ केले होते. यामध्ये नियमित कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर लाभ देण्यात आला होता.
00000

आम्हाला जोडण्यासाठी
anandi atta chakki V
सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला