आबापूरी-वर्णेच्या कुस्ती मैदानात सुबोध पाटील विजेता. प्रतिस्पर्ध्यांला लोळवत जिंकले लाखाचे इनाम

देशमुखनगर : आबापूरी-वर्णे (ता.सातारा) येथील स्वयंभू श्री काळभैरवनाथ यात्रेनिमित्त आयोजित करण्सात आलेल्या कुस्त्यांच्या जंगी मैदानात रूस्तम ए हिंद पैलवान अमोल बुचडे कुस्ती संकूल पुणेचा मल्ल सुबोध पाटील याने प्रतिस्पर्धी शिवनेरी तालीम संघ, अकलूजचा मल्ल संतोष जगताप याला चितपट करत प्रथम क्रमांची एक लाख रूपये इनामाची कुस्ती जिंकत उपस्थित कुस्ती शौकिनांच्या डोळ्याचे पारणे फेडले.
  यात्रेनिमित्त मंदीर परिसारीत डोंगरपायथ्याशी बांधलेल्या सुसज्ज कुस्ती आखाड्यात या मैदानाचे आयोजन करण्यात आले होते. या मैदानात रूपये शंभर पासून लाखा पर्यंतच्या कुस्त्या लावण्यात आल्या. यासाठी जिल्ह्यासह शेजारील जिल्ह्यातील नामांकीत मल्लांनी व कुस्ती शौकिनांनी हजेरी लावली होती. मैदानात यावेळी अनेक चटकदार कुस्त्या झाल्या. 
  कुस्ती मैदानाचा शुभारंभ देवस्थानचे शिवकळा अधिकारी प्रकाश कुलकर्णी यांनी केले. यावेळी आमदार शशिकांत शिंदे, टॉप गियर ट्रान्समिशनचे शशिकांत पवार, एनआयएस कोच जितेंद्र कणसे यांच्यासहकुस्ती क्षेत्रातील अनेक दिग्गजांनी हजेरी लावली. मैदान यशस्वी करण्यासाठी अष्टपैलू व्यायाम मंडळाच्या सर्व कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले.


आबापूरी-वर्णे (ता.सातारा)- प्रथम क्रमांकाची कुस्ती लावताना शशिकांत पवार व इतर.
आम्हाला जोडण्यासाठी
सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला
मुख्यमंत्री पदी एकनाथ शिंदे यांची घोषणा होताच गोव्यात बंडखोर आमदारांचा नाचीन आनंद व्यक्त