जेष्ठ नेते काॅग्रेड गोविंद पानसरे खटला सुनावणी....५ ऑगस्ट रोजी होणार....
प्रकाश शिंदे - Thu 28th Jul 2022 04:56 am
- बातमी शेयर करा
ज्येष्ठ नेते कॉम्रेड गोविंद पानसरे खून खटल्याची पुढील सुनावणी ५ ऑगस्ट रोजी होणार....सर्व आरोपींना न्यायालयात हजर राहण्याचे आदेश..... डाव्या चळवळीतील ज्येष्ठ नेते स्वर्गीय गोविंदराव पानसरे यांच्या खून प्रकरणी आज जिल्हा न्यायालयात सुनावणी झाली. मात्र न्यायालयाच्या आदेशानुसार बेंगलोर कारागृहातील ६ संशयित आरोपी हजर राहिले नाहीत. त्यामुळ दोष निश्चितीसाठी या खटल्याची सुनावणी ५ ऑगस्ट रोजी होणार असल्याच जिल्हा न्यायाधीश एस.एस.तांबे यांनी स्पष्ट केल.
ज्येष्ठ नेते काँम्रेड गोविंद पानसरे खून खटल्याप्रकरणी कोल्हापूर जिल्हा आणि सत्र न्यायालयामध्ये आज सुनावणी झाली. मागील सुनावणीवेळी न्यायालयान अटक असलेल्या सर्व ९ आरोपींना हजर करण्याचे आदेश केले होते. त्यानुसार येरवडा कारागृहातून वीरेंद्रसिंह तावडे, शरद कळसकर, सचिन अंदुरे या ३ संशयित आरोपींना आज न्यायालयासमोर हजर करण्यात आल. मात्र बेंगलोर इथल्या कारागृहातील अमोल काळे वासुदेव सूर्यवंशी भारत कुरणे अमित डेगवेकर अमित बदवी गणेश मिस्किन या ६ आरोपींना न्यायालयाच्या आदेशाची प्रत वेळेत न मिळाल्यानं त्यांना आज कोल्हापुरातील न्यायालयात हजर करता आलं नाही. न्यायालयासमोर सर्व संशयितांना एकत्रितरित्या सादर केले तर दोष निश्चिती करण सोप जाईल म्हणून सर्वांना एकत्र हजर ठेवण्याच्या सूचना द्याव्यात अशी मागणी समीर पटवर्धन यांनी केली.त्यामुळ दोष निश्चितीसाठी सर्व आरोपीना न्यायालयात हजर करण्याचे आदेश न्यायाधीशांनी केले आहेत. त्यानुसार ५ ऑगस्टला पुढील सुनावणी घेण्यात येणार आहे.
pansre
govindh
स्थानिक बातम्या
राजीनाम्याचा लेटर बॉम्ब; साताऱ्यात शिंदे शिवसेनेत खळबळ
- Thu 28th Jul 2022 04:56 am
अक्षय तृतीया विशेष : क्रांतिसूर्य महात्मा बसवेश्वर
- Thu 28th Jul 2022 04:56 am
पुसेसावळी दुरक्षेत्र परिसरात अवैध धंद्यांचा 'अंधार' आणि उपनिरीक्षकांची 'सुपरसोनिक' नेत्रे?
- Thu 28th Jul 2022 04:56 am
फलटण शहरातील दैनंदिन पाणीपुरवठ्यासाठी नगराध्यक्ष समशेर सिंह नाईक निंबाळकर ॲक्शन मोडवर
- Thu 28th Jul 2022 04:56 am
संबंधित बातम्या
-
परंपरागत शिवजयंती निमित्त फलटण येथे भव्य दुचाकी रॅली
- Thu 28th Jul 2022 04:56 am
-
फलटण येथे शिवजयंती उत्सव जल्लोषात साजरा
- Thu 28th Jul 2022 04:56 am
-
अक्षय तृतीया विशेष : क्रांतिसूर्य महात्मा बसवेश्वर
- Thu 28th Jul 2022 04:56 am
-
महानुभाव पंथीयांच्या दक्षिण काशी फलटण येथे घोड्याची यात्रा उद्या उत्साहात संपन्न.
- Thu 28th Jul 2022 04:56 am
-
तळदेव येथे सामाजिक समरसता जनजागृती बैठक उत्साहात संपन्न
- Thu 28th Jul 2022 04:56 am
-
फलटण शहरातील दैनंदिन पाणीपुरवठ्यासाठी नगराध्यक्ष समशेर सिंह नाईक निंबाळकर ॲक्शन मोडवर
- Thu 28th Jul 2022 04:56 am









