शासन आपल्या दारी उपक्रमास साताऱ्यात प्रतिसाद
Satara News Team
- Fri 8th Sep 2023 08:22 pm
- बातमी शेयर करा
सातारा, ; शिवसेनेचे शहरप्रमुख निलेश मोरे यांनी आयोजित पोलिस करमणूक केंद्रात आज आयोजित केलेल्या शासन आपल्या दारी उपक्रमास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या वेळी सुमारे एक हजार लाभार्थ्यांनी लाभ घेतला.
प्रारंभी प्रांताधिकारी सुधाकर भोसले, तहसीलदार राजेश जाधव, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विनोद चव्हाण, मुख्यमंत्री जनकल्याण कक्षाचे शैलेंद्र साठे, शिवसेनेच्या महिला उपजिल्हाप्रमुख वैशालीताई झांझुर्णे यांच्या प्रमुख उपस्थितीत दिप प्रज्वलन करुन उपक्रमाचे उदघाटन करण्यात आले.
शिवसेनेचे शहरप्रमुख निलेश मोरे यांनी स्वागत केले. या वेळी प्रांताधिकारी भोसले म्हणाले,‘‘ शासन आपल्या दारी उपक्रमातून शासनाच्या विविध योजनांचा लाभ गरजूंना होत आहे. या योजनांचा लाभार्थ्यांनी लाभ घ्यावा.’’
दरम्यान, या उपक्रमात पळसावडे येथील संयुक्त वन व्यवस्थापन समितीच्या वतीने गॅस व शेगडीचे वाटप करण्यात आले. सातारा नगरपालिकेच्या वतीने दिव्यांग फेरीवाल्यांना जागांचे वाटप करण्यात आले. वीज वितरण कंपनीकडून ४० जणांना वीज मीटर देण्यात आले. कामगार आयुक्तांकडून ८४ कामगारांना पेट्यांचे वाटप करण्यात आले. पशुसंवर्धन विभागाने नऊ जणांना लाभ दिला. समाजकल्याण विभागाकडून लाभार्थ्यांना १७ टॅबचे वाटप करण्यात आले. कृषी व तंत्रज्ञान विभागाकडून प्रमाणपत्रे व ५० टक्के अनुदानातून लाभार्थ्यांना शेती अवजारे देण्यात आली. उपप्रादेशिक परिवहन विभागातर्फे शिकाऊ लायसन्सचे वाटप व एसटीच्या वतीने पासचे वाटप करण्यात आले. अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या वतीने योजनांची माहिती देऊन काहींना पात्रता प्रमाणपत्र देण्यात आले. प्रशासनाकडून मतदान कार्डचेही वितरण करण्यात आले. संजय गांधी निराधार योजना, पुरवठा विभाग, सामाजिक वनीकरण, वन विभाग, नगर भूसंपादन विभाग,महिला व बालकल्याण विभाग, दुय्यम निबंधक, शिक्षण विभाग, जिल्हा मध्यवर्ती बॅंक, बांबू लागवड विभाग, पशुसंवर्धन विभाग आदी विभागांनी लाभार्थ्यांना लाभ दिला.
कार्यक्रमासाठी शिवसेनेचे शहरप्रमुख निलेश मोरे, शहर संघटक अमोल इंगोले, किरण कांबळे, उपशहरप्रमुख बाळासाहेब भिसे, अमोल खुडे, विक्रम यादव, अजिंक्य राजपूत, ओंकार बर्गे, विभागप्रमुख मनोज भोसले,सिद्धेश जाधव,विशाल वायदंडे, ओंकार गायकवाड,आदित्य यादव, प्रथमेश बाबर,यश खत्री, शुभम मेनकुदळे, असिफ मुलाणी, संदीप पवार, साईराज इथापे, सनी गडकरी,गुरू घोरपडे,रविंद्र साळुंखे, तसेच शिवसेनेचे सर्व आजी-माजी पदाधिकाऱ्यांचे सहकार्य लाभले.

शासन आपल्या दारी उपक्रमाचे उदघाटन करताना….
स्थानिक बातम्या
साताऱ्यात भुयारी गटार योजना वाऱ्यावर
- Fri 8th Sep 2023 08:22 pm
विठ्ठलाच्या ओढीने धावणाऱ्या पावलांना बळ देणारा चरणसेवा उपक्रम
- Fri 8th Sep 2023 08:22 pm
माथेरानला चौकशी समिती, महाबळेश्वरला मोकळे रान? शासनाच्या दुहेरी भूमिकेवर संताप
- Fri 8th Sep 2023 08:22 pm
रयतराजच्या दणक्याने चड्डी बनियान डॉक्टर निलंबित तर दुसऱ्याची चौकशी.....
- Fri 8th Sep 2023 08:22 pm
पालखी सोहळा स्वागतासाठी सातारा जिल्हा परिषद सज्ज- डॉक्टर प्रियाताई शिंदे
- Fri 8th Sep 2023 08:22 pm
संबंधित बातम्या
-
फलटण शहरातील अंतर्गत रस्त्यांसाठी प्रथमच मोठा भरीव 70 कोटींचा निधी.
- Fri 8th Sep 2023 08:22 pm
-
नगराध्यक्ष समशेरसिंह यांनी उघड केला नगर परिषदेतील कर घोटाळा, अनेक वर्षापासून सुरू होता कर घोटाळा
- Fri 8th Sep 2023 08:22 pm
-
पालखी सोहळा स्वागतासाठी सातारा जिल्हा परिषद सज्ज- डॉक्टर प्रियाताई शिंदे
- Fri 8th Sep 2023 08:22 pm
-
कसं काय पाटील बर हाय का विधानसभेत जे ऐकले ते खर आहे का? ॲड. संदीप कांबळे.
- Fri 8th Sep 2023 08:22 pm












