काटामारीतून कारखानादारांनी शेतकऱ्यांना लुटले-माजी खासदार राजू शेट्टी

स्वाभिमानीच्या सभेस नागठाणेत उत्स्फूर्त प्रतिसाद

नागठाणे  : कारखान्यांनी काटामारीतून शेतकऱ्यांचे कोट्यावधी रूपये लुटले आहेत. ही लुट थांबविण्यासाठी पेट्रोलियम कंपन्याप्रमाणे  आॅनलाईन वजनकाटा साखर कारखान्यांनी बसविण्यासाठी सरकारवर दबाव आणणार आहे. आले व्यापाऱ्यांनी पहिल्याप्रमाणेच आल्याची एकत्रित खरेदी करावी, अन्यथा गाठ स्वाभिमानीशी आहे असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी यांनी दिला. नागठाणे (ता. सातारा) येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने एक रकमी एफआरपी व आले पिकांची एकत्रित खरेदी यासाठी जागर सभेचे अयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी पंचायत समिती सदस्य बाळकृष्ण साळुंखे होते. यावेळी प्रदेशाध्यक्ष जालिंदर पाटील, जयकुमार कोल्हे, राज्य प्रवक्ते अनिल पवार, जिल्हाध्यक्ष राजू शेळके, देवानंद पाटील, राज्य कार्यकारणी सदस्य अर्जुनराव साळुंखे, अॅड विजयराव चव्हाण, अॅड सतीश कदम, कृषिभूषण मनोहर साळुंखे आदी उपस्थित होते.          यावेळी पुढे बोलताना राजू शेट्टी पुढे म्हणाले, कोल्हापूर, सांगलीत आम्ही एफआरपीपेक्षा जास्त घेतो आणि तुमच्या जिल्ह्यात एफआरपी कपात केली जात असेल तर शेतकऱ्यांनी संघटीत होणे गरजेचे आहे. संघटीत झाल्यानेच तुम्हाला रेल्वेकडून १८०० कोटी रूपये मिळाले आहेत. काटामारीतून होत असलेल्या साखर चोरीमुळे २२५ कोटीचा जीएसटी बुडवला जात असल्याचे संबधित विभागाला निदर्शनास आणु दिले आहे. काटामारी शेतकऱ्यांच्या मुळावर आली असून ही रोखण्यासाठी पेट्रोलियम कंपन्याप्रमाणे आॅनलाईन प्रणालीचा वापर कारखानदारांनी करावा यासाठी शासनावर स्वाभिमानी दबाब वाढविणार असल्याचेही त्यांनी सांगितले. आले खरेदी करताना व्यापारी नवे-जूने करत आहे. ही पद्धत शेतकऱ्यांच्या नुकसानीची आहे. यासाठी सातारा, औरंगाबाद, जालना आदी ठिकाणी सभा घेऊन एकत्रित खरेदी करण्यास भाग पाडणार आहे. यातूनही काही व्यापारी वाकड्यात गेल्यास त्यांची गाठ स्वाभिमानीसी आहे असा इशाराही त्यांनी दिला.         यावेळी जालिंदर पाटील, राजू शेळके, अनिल पवार, मनोहर साळुंखे आदीची भाषणे झाली. कार्यक्रमात विक्रम साळुंखे यांनी संघटनेस ११ हजार रूपये तसेच इतर शेतकऱ्यांनी यशाशक्ती देणगी दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजय कांबळे, दादा कांबळे यांनी केले तर संतोष साळुंखे यांनी आभार मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संजय जाधव, दादासाहेब यादव, प्रमोद जगदाळे आदीनी परिश्रम घेतले. फोटो- नागठाणे :- सभेत मार्गदर्शन करताना राजू शेट्टी त्यावेळी बाळकृष्ण साळुंखे, जालिंदर पाटील, जयकुमार कोल्हे, अनिल पवार, राजू शेळके, मनोहर साळुंखे आदी.समोर उपस्थित जनसमुदाय

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

anandi atta chakki V
सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला