सातारा जिल्ह्यातील वाठार स्टेशन येथे सर्व पक्षांच्या वतीने रेल्वे रोको आंदोलन.

 वाठार स्टेशन  : रेल्वे गेट नंबर 45 च्या भुयारी पादचारी मार्गाचे काम रखडल्याने वाठार स्टेशन पंचक्रोशीतील ग्रामस्थ आक्रमक सातारा जिल्ह्यातील मोठी बाजारपेठ समजल्या जाणाऱ्या वाठार स्टेशन येथे गेट नंबर 45 येथे एक भुयारी पादचारी मार्ग रेल्वेच्या माध्यमातून करण्यात आला आहे परंतु या पादचारी मार्गाचे काम गेली एक वर्ष रखडल्याने या पादचारी मार्गामुळे वाठार स्टेशन पंचक्रोशी मधील ग्रामस्थांच्या जीवितास धोका असल्याने वाठार स्टेशन पंचक्रोशी मधील ग्रामस्थांनी याबाबतीत वेळोवेळी रेल्वे प्रशासनाकडे पत्रव्यवहार व काम चालू करण्यासंदर्भातली मागणी करून सुद्धा रेल्वे प्रशासनाने याबाबत कोणतीच भूमिका घेतली नसल्याने वाठार स्टेशन पंचक्रोशीमधील ग्रामस्थ आक्रमक झाले व यांनी आज सर्व पक्षियांच्या वतीने रेल रोको केला. हे रेल रोको आंदोलन एवढे मोठे होते की या गेट नंबर 45 च्या रेल्वे रुळावर सर्व आंदोलनकरते बसून ढोल ताशाच्या गजरात रेल्वे प्रशासनाचा निषेध करत होते तसेच रेल्वे प्रशासनाच्या विरोधात घोषणाही देत होते या आंदोलनाचा भडका एवढा मोठा होता की या आंदोलनकर्त्यांच्या घोषणा संपूर्ण वाठार स्टेशन गावामध्ये पसरत होत्या याबाबतचा घेण्यात आलेला थेट आढावा.

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

anandi atta chakki V
सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला