सातार्यात उद्या अजिंक्यतार्यावर होणार छ.शाहू महाराज राज्यभिषेक दिन सोहळा
Satara News Team
- Thu 11th Jan 2024 10:46 am
- बातमी शेयर करा
सातारा : छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याला साम्राज्यात रूपांतरीत करणारे छत्रपती शाहू महाराज यांचा कार्यकाळ कायमच दुर्लक्षीत राहिला आहे. त्यामुळे शिवराज्यभिषेक दिन उत्सव समितीच्यावतीने त्यांचा राज्यभिषेक दिन हा ‘‘सातारा स्वाभिमान दिन’’ म्हणून साजरा केला जातो. यंदा शुक्रवार दि.12 जानेवारी रोजी किल्ले अजिंक्यतार्यावर कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आल्याची माहिती सातारा येथे पत्रकार परिषदेत शिवराज्यभिषेक दिन उत्सव समितीच्यावतीने सुदाम गायकवाड, अमोल मोहिते, प्रशांत आहेरराव, कन्हैय्यालाल राजपुरोहित, अंजली कुलकर्णी, रेणू येळगावकर आणि अंजली शिंदे, गौरी आवळे, सौ तेजस्विनी केसरकर यांनी दिली.
छत्रपती शाहू महाराजांनी स्वराज्याचा साम्राज्यात विस्तार केला. त्याच मराठ्यांच्या राजधानी सातारा नगरीत याही वर्षी विविध कार्यक्रमांचे आयोजन स्वाभिमान दिना निमित्ताने शुक्रवार 12 जानेवारी रोजी करण्यात आले आहे. छत्रपती शाहू महाराज यांच्या पालखीची भव्य मिरवणूक खासदार श्री.छ.खासदार उदयनराजे भोसले, श्री.छ.आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले, जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी, पोलीस अधीक्षक समीर शेख, जिल्हा परिषद सीईओ ज्ञानेश्वर खिलारी यांच्या प्रमुख उपस्थितीत काढण्यात येणार आहे.
छत्रपती शाहू महाराजांची पालखी शाही पध्दतीने किल्ले अजिंक्यतार्याच्या महाद्वारातून हनुमान मंदिर मार्गे मंगळाई मंदिर, रनेश्वर मंदिर मार्गे राजसदरेवर दाखल होणार आहे. यानिमित्त शाहूनगरीचे नाव जागतिक पातळीवर नेणार्या सातारच्या लाल बहादूर शास्त्री महाविद्यालयातील तिरंदाज आदिती स्वामी हिचा आणि छत्रपती शिवाजी कॉलेजचा ओजस देवतळे यांच्यासह अनेक मान्यवरांचा विशेष सत्कार या स्वाभिमान दिन सोहळ्यात सन्मान चिन्ह देऊन मान्यवरांच्या हस्ते करण्यात येणार आहे. किल्ले अजिंक्यतारा गडावर असलेल्या मंगळाई मंदिरात आणि रत्नेश्वर मंदिरात शिवराज्यभिषेक दिन उत्सव समितीच्यावतीने विधिवत पध्दतीने पूजा करण्यात येणार आहे.
सातार्यातील मुस्लिम समाजाला विशेष सन्मानछत्रपती शाहू महाराजांनी शाहूनगरीत मुस्लिम समाजासाठी मशीद बांधली. आजही ती मशीद दिमाखात सातारचे वैभव आणि इतिहासाची साक्ष आहे. सातारा स्वाभिमान दिनाच्या सोहळ्यात मुस्लिम समाजाचा विशेष सन्मान मान्यवरांच्या हस्ते करण्यात येणार आहे. तसेच त्यांना पालखीचे विशेष मानकरी म्हणून विशेष मान असणार आहे. असेही पत्रकार परिषदेत सांगण्यात आले आहे.
स्थानिक बातम्या
राजीनाम्याचा लेटर बॉम्ब; साताऱ्यात शिंदे शिवसेनेत खळबळ
- Thu 11th Jan 2024 10:46 am
अक्षय तृतीया विशेष : क्रांतिसूर्य महात्मा बसवेश्वर
- Thu 11th Jan 2024 10:46 am
पुसेसावळी दुरक्षेत्र परिसरात अवैध धंद्यांचा 'अंधार' आणि उपनिरीक्षकांची 'सुपरसोनिक' नेत्रे?
- Thu 11th Jan 2024 10:46 am
फलटण शहरातील दैनंदिन पाणीपुरवठ्यासाठी नगराध्यक्ष समशेर सिंह नाईक निंबाळकर ॲक्शन मोडवर
- Thu 11th Jan 2024 10:46 am
संबंधित बातम्या
-
परंपरागत शिवजयंती निमित्त फलटण येथे भव्य दुचाकी रॅली
- Thu 11th Jan 2024 10:46 am
-
फलटण येथे शिवजयंती उत्सव जल्लोषात साजरा
- Thu 11th Jan 2024 10:46 am
-
अक्षय तृतीया विशेष : क्रांतिसूर्य महात्मा बसवेश्वर
- Thu 11th Jan 2024 10:46 am
-
महानुभाव पंथीयांच्या दक्षिण काशी फलटण येथे घोड्याची यात्रा उद्या उत्साहात संपन्न.
- Thu 11th Jan 2024 10:46 am
-
तळदेव येथे सामाजिक समरसता जनजागृती बैठक उत्साहात संपन्न
- Thu 11th Jan 2024 10:46 am
-
फलटण शहरातील दैनंदिन पाणीपुरवठ्यासाठी नगराध्यक्ष समशेर सिंह नाईक निंबाळकर ॲक्शन मोडवर
- Thu 11th Jan 2024 10:46 am









