शिक्षण प्रसारक संस्था, करंजे पेठ संचालित न्यू इंग्लिश मिडियम स्कूल च्या चि. ऋग्वेद नितीन लावंगरे याचा 'जिल्हास्तरीय उशू' स्पर्धेत प्रथम क्रमांक

सातारा  : शिक्षण प्रसारक संस्थेच्या न्यू इंग्लिश मिडियम स्कूलच्या इयत्ता दहावीच्या वर्गात शिकत असणाऱ्या चि. ऋग्वेद नितीन लावंगरे याने जिल्हास्तरीय' उशु' या क्रीडा प्रकारामध्ये 40 किलो वजनी गटात प्रथम क्रमांक पटकावून,त्याची विभागीय खेळासाठी निवड झालीआहे. आपल्या शाळेतील विद्यार्थ्यांना शिक्षण प्रसारक संस्था आर्चरी अकॅडमी मध्ये धनुर्विद्येचे प्रशिक्षणही दिले जाते. या खेळातून चि. पार्थ सुशांत साळुंखे हा आपल्याच शाळेचा विदयार्थी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर खेळत आहे. तसेच इतरही अनेक विदयार्थी राष्ट्रीय व राज्य पातळीवर आर्चरी या खेळातून चमकले आहेत.खो खो, कबड्डी या सारखे सांघिक खेळ तसेच वैयक्तिक खेळामध्ये ही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले जाते. विद्यार्थ्यांना त्यांच्यातील आत्मविश्वास द्विगुणित करण्यासाठी विविध शालेय स्तर स्पर्धांमध्ये खेळवले जाते. यातून अनेक विद्यार्थी विविध खेळातून जिल्हास्तर व विभाग स्तरापर्यंत पोहोचले आहेत. विभाग स्तरावर निवड झालेल्या ऋग्वेद चे अभिनंदन शिक्षण प्रसारक संस्थेच्या अध्यक्षा मा.सौ. वत्सला डुबल मॅडम,उपाध्यक्ष मा. श्री. जगन्नाथ किर्दत सर , उपाध्यक्ष मा. श्री. नंदकिशोर जगताप सर , सचिव मा. श्री. तुषार पाटील सर , स्कूल कमिटी चेअर पर्सन मा.सौ. प्रतिभा चव्हाण मॅडम, संचालिका मा. सौ. हेमकांची यादव मॅडम व इतर सर्व संचालक , मुख्याध्यापिका, क्रीडा शिक्षिका, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी तसेच सर्व पालक व करंजे ग्रामस्थ यांनी अभिनंदन केले व विभागीय स्पर्धेसाठी त्याला शुभेच्छा दिल्या.

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला
मुख्यमंत्री पदी एकनाथ शिंदे यांची घोषणा होताच गोव्यात बंडखोर आमदारांचा नाचीन आनंद व्यक्त