प्रीतम कळसकर यांच्या वाढदिनी उद्या विविध उपक्रमांचे आयोजन

सातारा : खा. श्री. छ. उदयनराजे

भोसले यांचे कट्टर समर्थक व सामाजिक 'कार्यकर्ते प्रीतम कळसकर यांचा दि. २० रोजी वाढदिवस साजरा करण्यात येत आहे. त्यानिमित्त खा. श्री. छ. उदयनराजे भोसले मित्र समूह आणि छत्रपती युवा प्रतिष्ठानच्या वतीने विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

सामाजिक कार्यकर्ते प्रीतम कळसकर यांच्यावतीने सकाळी ७.३० वाजता शिवतीर्थ पोवई नाका येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला दुग्धाभिषेक व आरती करण्यात येणार आहे. त्यानंतर सकाळी ८ वाजता रविवार पेठेतील पंताचा गोट येथील मारूती मंदिरात आरतीचे आयोजन करण्यात आले आहे.

सकाळी १० वाजता सातारा येथील बालसुधारगृह (रिमांड होम) येथे फळे वाटप व त्यानंतर सकाळी ११ वाजता आशा भवन स्कूल, कोडोली येथे शालेय साहित्याचे वाटप करण्यात येणार आहे. दुपारी १२ वाजता सातारा सिव्हिल हॉस्पिटलमध्ये रूग्णांना भोजन व फळे वाटप तसेच दुपारी १२.३० वाजता, शेंद्रे (ता. सातारा) येथील एहसास मतिमंद शाळा शाळेत भोजन वाटप करण्यात येणार आहे.

सातारा पालिका शाळांमध्येही शालेय साहित्याचे वाटप करण्यात येणार आहे. सामाजिक कार्यकर्ते प्रितम कळसकर हे राजपथावरील सातारा पोलिस करमणूक केंद्रात सायंकाळी ७ वाजल्यापासून शुभेच्छांचा स्वीकार करणार आहे. वाढदिवसानिमित्त आयोजित उपक्रमांचा लाभ घ्यावा असे आवाहन खा. श्री. छ. उदयनराजे भोसले मित्र समूह आणि छत्रपती युवा प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आहे.

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

anandi atta chakki V
सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला