येरळवाडी तलाव राखीव क्षेत्रातून वगळणार

आ.जयकुमार गोरे यांचे प्रयत्न;राज्य शासन करणार केंद्राला शिफारस

 दहिवडी  : मायणी समूह वन संवर्धन राखीव क्षेत्रातून समूह क्रमांक २ येरळवाडी तलावाचे ६३३ हेक्टर क्षेत्र वगळण्याची शिफारस राज्य शासन त्वरित करणार असल्याची ग्वाही वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली. 

गुरुवारी विधानभवनात आमदार जयकुमार गोरे यांच्या प्रयत्नातून आयोजित बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.खटाव तालुक्यातील पिण्याच्या आणि शेतीबाबतीत तारणहार ठरणारा येरळवाडी तलाव अधिसूचनेतून वगळण्यात येणार असल्याने परिसरात आनंदोत्सव करण्यात आला.

दरम्यान या बैठकीस आमदार जयकुमार गोरे,माजी आमदार डॅा.दिलीपराव येळगावकर,माजी आमदार प्रभाकर घार्गे,भाजपचे जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम ,श्री.सिद्धनाथ पतसंस्थेचे चेअरमन अरुण गोरे,नाना पुजारी आणि अधिकारी उपस्थित होते. 

आमदार गोरे प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हणाले की, खटाव तालुक्याच्या दुष्काळी भागासाठी येरळवाडी तलाव पिण्याच्या पाण्यासाठी आणि शेती पाण्याचा एकमेव मोठा स्त्रोत आहे.या तलावातून अनेक गावांच्या पिण्याच्या पाण्याच्या योजना कार्यान्वित करण्यात आल्या आहेत.या तलावातील पाण्यावर मोठ्या प्रमाणात शेती ही अवलंबून आहे.आमच्यासाठी हा तलाव अत्यंत महत्त्वाचा असताना आघाडी सरकारने चुकीचा निर्णय घेऊन मायणी समूह संवर्धन क्षेत्रात त्याचा समावेश केला. हा निर्णय घेताना स्थानिकांच्या लोकभावना विचारात घेतल्या नाहीत.आम्ही या निर्णयाच्या विरोधात आहोत हा निर्णय रद्द करावा यासाठी विधान भवनात बैठक आयोजित करण्यात आली होती. वनमंत्री मुनगंटीवार यांना मी सर्व माहिती देऊन हा तलाव आपल्यासाठी खूप महत्त्वाचा असलेल्याचे पटवून दिले. आघाडी सरकारने काढलेली अधिसूचना रद्द करण्याचा अधिकार केंद्र शासनाला असल्याने राज्य शासन त्वरित याबाबत केंद्राकडे शिफारस करणार आहे. लागू झालेल्या अधिसूचना निश्चित रद्द केली जाईल अशी ग्वाही वनमंत्री मुनगंटीवार यांनी आमदार गोरे यांना दिल्याचे सांगितले.

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला
मुख्यमंत्री पदी एकनाथ शिंदे यांची घोषणा होताच गोव्यात बंडखोर आमदारांचा नाचीन आनंद व्यक्त