या ,पहा आणि तरचं कारवाईचा निर्णय घ्या

  सातारा  : सातारा शहरातील राजवाडा चौपाटी आणि छत्रपती शिवाजी संग्रहालयाच्या परिसरातील अतिक्रमण हटवून अनेक दिवसांनंतर पालिकेच्या अतिक्रमण विभागा कर्तव्यदक्ष असल्याचे दिसून आले. साईबाबा चौकात अतिक्रमणाच्या विळखा पडत असून नियमित वाहतूक कोंडीचा प्रचंड त्रास होतो.त्यात लवकरच छत्रपतींच्या वाघनख्या साताऱ्यात येणार असून त्या पाहण्यासाठी येणाऱ्या शिवभक्तांना या चौकातील वाहतूक कोंडीचा नाहक त्रास होऊ नये म्हणून, अतिक्रमणाचा विळखा सोडविण्यासाठी विनंती पुर्वक निवेदन दिले आहे. काही कारवाई केली नाही तर १९ जुलै पासून गांधीगिरी मार्गाने लक्षवेधी आंदोलन करणार असल्याचे सामाजिक कार्यकर्ते अजय पार्टे यांनी जिल्हा पोलिस अधीक्षक, बांधकाम अभियंता, नगरपालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे.


गोडोलीतील साईबाबा मंदिरासमोर चौकात रस्त्यावर अनाधिकृत बांधकाम करून उभारलेले मंदिर, चहूबाजूंनी हातगाडे, रस्त्यावर पार्किंग, सिग्नल यंत्रणा बंद , वाहतूक पोलीस वाहतूक नियंत्रण न करता वाहनधारकांची कागदपत्रे तपासण्यासाठी धडपडतात, असे या चौकाचे त्रांगडे झाले असून याकडे जिल्हा पोलीस अधीक्षक, कार्यकारी अभियंता 
बांधकाम विभाग, मुख्याधिकारी
सातारा नगरपरिषद यांनी याकडे पुर्णपणे दुर्लक्ष केले आहे. यामुळे नियमित वाहतूक कोंडीचा नाहक त्रास नागरिकांना होतो. साईबाबा चौकातील अतिक्रमणावर कारवाई करणेबाबत तिघांना विनंती करत निवेदन दिले असून कारवाईची अपेक्षा केली आहे.ती दि.१८ जुलै पर्यंत न झाल्यास दि.१९ जुलै पासून याच चौकात गांधीगिरी मार्गाने लक्षवेधी आंदोलन करणार असल्याचे अजय पार्टे यांनी निवेदनात म्हटले आहे.

साईबाबा चौकात सर्व बाजूंनी अतिक्रमणाचा विळखा पडला आहे. एकाही गाळेधारकाने पार्किंगसाठी जागा सोडली नसल्याने रस्त्यावर वाहने उभी केली जातात.तर  रोज नवीन अनाधिकृत हातगाडे उभे राहू लागल्याने चौकात वाहतूक कोंडी होते.येथील वाहतूक पोलीस वाहतूक कोंडीकडे दुर्लक्ष करून  वरकमाई करताना दिसतो.
आजपर्यंत या चौकातील एकदा ही एकाही अतिक्रमणावर कारवाई केली नाही. याला लोकप्रतिनिधींचा नाकर्तेपणा आणि प्रशासनातील उदासीनता कारणीभूत ठरत आहे. नगरपालिका, बांधकाम विभाग आणि पोलीसांना या चौकाला पडलेला अतिक्रमणाचा विळखा सोडविण्यासाठी प्रयत्न केले जात नाहीत, ही खेदाची बाब आहे.
साईबाबा चौकात शालेय विद्यार्थी, नोकरदार, महिला, वृध्दांना 
नियमित वाहतूक कोंडीचा नाहक त्रास होतो. स्थानिक नागरिक या कोंडीमुळे त्रस्त झाले असून छत्रपतींच्या वाघनख्या पाहण्यासाठी ऐतिहासिक साताऱ्यात येणाऱ्या शिवभक्तांना ही या वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागू नये, यासाठी या चौकातील अतिक्रमण काढण्यासाठी प्रशासनाने तत्काळ अंमलबजावणी करावी, अशी विनंती निवेदनात केली आहे. 

पोलीस, बांधकाम विभाग आणि नगरपरिषदेच्या अधिकाऱ्यांनी या चौकात यावे, पहावे आणि अतिक्रमणावर कारवाई करावी अशी मागणी अजय पार्टे यांनी केली आहे.

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

anandi atta chakki V
सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला