जिल्ह्यात ७४३ शाळा खोल्या धोकादायक...!!

सातारा - जिल्हा परिषदेच्या २२७ शाळांच्या ७४३ खोल्या धोकादायक बनल्याचे जिल्ह्यात चित्र आहे. ऐन पावसाळ्याच्या दिवसात विद्यार्थी हलाखीच्या परिस्थितीत शिक्षण घेत असून, एखादी दुर्घटना घडल्यास त्याला जबाबदार कोण? असा प्रश्‍न उपस्थित होत आहे. शाळांच्या खोल्या पावसाळ्यापूर्वी दुरुस्त करणे आवश्‍यक होते. मात्र, शिक्षण विभागाच्या डोळेझाकपणामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्‍न ऐरणीवर आला आहे.
जिल्ह्यात दोन हजार ७४५ शाळा आहेत. यामधील दहा टक्के शाळांच्या खोल्या धोकादायक स्थितीत आहेत. त्यातील काही शाळा या जिल्ह्यातील दुर्गम भागातील आहेत. त्या भागात पाऊस अधिक प्रमाणात असतो. धोकादायक खोल्या असलेल्या शाळांमधील अनेक खोल्यांना तडे जाणे, छत गळणे, पत्र्यातून पावसाचे पाणी येणे यासारखी स्थिती आहे. या परिस्थितीमुळे शाळेतील विद्यार्थी जीव मुठीत घेऊन शिक्षण घेत आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्‍न समोर आला आहे.
दरम्यान, जिल्हा परिषदांच्या शाळांमध्ये डिजिटल शिक्षण पध्दती सुरू केली असताना, विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी सुसज्ज खोल्या असणे आवश्‍यक आहे. मात्र, झेडपीच्या काही शाळांमध्ये धोकादायक स्थितीत शिक्षण सुरू आहे. याबाबत काही शाळांच्या शिक्षकांनी शाळांच्या स्थितीबाबत शिक्षण विभागाला माहितीही दिली होती. परंतु, शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांनी त्याकडे दुर्लक्ष केल्याचे दिसून येते. धोकादायक शाळा खोल्यांची संख्या पाहता सर्वाधिक धोकादायक खोल्यांची संख्या कऱ्हाड (२८२) तालुक्यात तर सर्वांत कमी महाबळेश्र्वर (७) तालुक्यात आहे.

झाडाखाली भरते शाळा

चिंचणी (ता. खटाव) गावातील शाळा धोकादायक स्थितीत आहे. त्या भागातील विद्यार्थ्यांची शाळा झाडाखाली भरत आहे. या शाळेत आठ खोल्या असून त्यातील एक खोली स्लॅबची आहे. ती देखील गळत आहे. त्यामधील लोखंडी सळ्या उघड्यावर असून उर्वरित पत्र्याच्या दोन खोल्यांमधून पाणी झिरपत आहे. त्यामुळे अनेकदा विद्यार्थ्यांना झाडाखाली बसूनच शिक्षण घ्यावे लागत आहे.

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

anandi atta chakki V
सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला