सातारा जिल्हा पोलीस क्रीडा प्रबोधिनीमधील ०३ खेळाडुंची राष्ट्रीय स्पर्धेकरीता महाराष्ट्र संघातुन निवड
Satara News Team
- Sat 19th Apr 2025 03:54 pm
- बातमी शेयर करा
सातारा : यवतमाळ येथे दि. १६/०४/२०२५ ते १७/०४/२०२५ रोजी पार पडलेल्या १९ वर्षाखालील बॉक्सींग महाराष्ट्र संघ निवड चाचणी मध्ये सातारा जिल्हा पोलीस क्रीडा प्रबोधिनी मधील प्रशिक्षणार्थी चि. सैफअलि साजिद झारी (९० किलो)- सुवर्ण पदक, कु. श्रुती सचिन शिंदे (७०-७५ किलो) - सुवर्ण पदक, कु. प्रांजली दिपक रावळ (७५-८०किलो) - रौप्य पदक, कु. अपुर्वा प्रशांत कदम (५७ - ६० किलो)- कांस्य पदक कु. सृष्टी अमोल मोरे (६०-६५ किलो)- कांस्य पदक, चि. रोहन विजय शिंदे (६५-७० किलो)- कांस्य पदक, चि. श्रीराज सतिश शिंदे (८०-८५ किलो) कांस्य पदक अशी ०२ सुवर्ण, ०१ रौप्य व ०४ कांस्य अशी एकुण ०७ पदके प्राप्त केलेली आहेत व सुवर्ण पदक विजेते खेळाडु यांची १९ वर्षा खालील राष्ट्रीय बॉक्सींग स्पर्धेकरीता निवड झालेली आहे. तसेच शालेय राज्यस्तरीय वॉक्सींग क्रीडा स्पर्धेमध्ये चि. शौर्य योगेश बनकर याने सुवर्ण पदक प्राप्त करुन आगामी होणाऱ्या १४ वर्षाखालील राष्ट्रीय बॉक्सींग स्पर्धेकरीता निवड झालेली आहे.
सातारा जिल्हा पोलीस क्रीडा प्रबोधिनी येथे प्रशिक्षण घेत असलेले प्रशिक्षणार्थी यांना श्री सुनिल सपकाळ स्पोर्ट इन्चार्ज / प्रबोधिनी व्यवस्थापक, सॅम्युअल भोरे सहा. स्पोर्ट इन्चार्ज / प्रबोधिनी व्यवस्थापक, प्रशिक्षक पोहवा /१९० सागर जगताप (एन. आय.एस. बॉक्सींग प्रशिक्षक), मपोकॉ / ८४ पुजा शिंदे (बॉक्सींग प्रशिक्षक) यांनी शास्त्रशुद्ध पद्धतीने प्रशिक्षण दिले.
सातारा जिल्हा पोलीस क्रीडा प्रबोधिनीतील निवड झालेले प्रशिक्षणार्थी व त्यांना उत्कृष्ठ रित्या मार्गदर्शन व प्रशिक्षण दिलेले प्रबोधिनी व्यवस्थापक, प्रशिक्षक यांचे उल्लेखनिय कामगिरी बाबत श्री. समीर शेख पोलीस अधीक्षक सातारा, श्रीमती डॉ. वैशाली कडुकर अपर पोलीस अधीक्षक सातारा, श्री. अतुल सबनीस पोलीस उप-अधीक्षक (गृह), श्री. राजु शिंदे राखीव पोलीस निरीक्षक, श्री सुनिल चिखले पोलीस उप-निरीक्षक पोलीस कल्याण व मानवी संसाधन कार्यालय सातारा यांनी हार्दिक अभिनंदन केले आहे. तसेच पुढील स्पर्धांकरीता शुभेच्छा दिल्या आहेत.
स्थानिक बातम्या
सातारा नगरपरिषद निवडणुकीला उच्च न्यायालयात आव्हान
- Sat 19th Apr 2025 03:54 pm
माझ्यावर केलेले आरोप बिनबुडाचे : प्रकाश शिंदे : आमच्या कुटुंबाला टार्गेट करण्याचा प्रयत्न
- Sat 19th Apr 2025 03:54 pm
न्यू इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये शालेय क्रीडा महोत्सवाचे उद्घाटन उत्साहात
- Sat 19th Apr 2025 03:54 pm
सातारा नगरपालिका निवडणुक : ५१ सराईत गुन्हेगार हद्दपार
- Sat 19th Apr 2025 03:54 pm
दोन्ही राजेंविरोधात जनतेची नाराजी : शरद काटकर
- Sat 19th Apr 2025 03:54 pm
शिक्षण प्रसारक संस्थेतील विद्यार्थी अध्ययनासाठी करणार टॅबचा वापर
- Sat 19th Apr 2025 03:54 pm
संबंधित बातम्या
-
सहा.पो.नि. अक्षय सोनवणे यांचा सराईत गुन्हेगारांना दणका
- Sat 19th Apr 2025 03:54 pm
-
पुसेसावळीतील सावकारी च्या 'उदय' मुळे कळंबीतील एक कुटुंब 'अस्त' होण्याच्या मार्गावर...
- Sat 19th Apr 2025 03:54 pm
-
फलटण शहरचे पोलीस निरीक्षक हेमंतकुमार शहा यांची तडकाफडकी बदली
- Sat 19th Apr 2025 03:54 pm
-
वडूज येथील रास्तभाव दुकानाबाबत दोष आढळल्याने नोटीस.
- Sat 19th Apr 2025 03:54 pm
-
औंध पोलिस ठाण्याचे कारभारी मतेंवर गोरे अंकुश ठेवणार? कि पोलिस अधीक्षक दोषी ठरवणार?
- Sat 19th Apr 2025 03:54 pm
-
जिल्हा परिषद नगररचना विभागात रंगली सामूहिक बिर्याणीची पार्टी.
- Sat 19th Apr 2025 03:54 pm
-
अजंठा चौकात टपरी चालकाचे नगरपालिकेला आव्हान
- Sat 19th Apr 2025 03:54 pm
-
औंध ग्रामीण रूग्णालयातील ऑक्सिजन वर असलेल्या व्यवस्थेने घेतला नवजातचा बळी?
- Sat 19th Apr 2025 03:54 pm













