सर्वसामान्य जनतेच्या मते औंध पोलिस ठाण्याचे विद्यमान कारभारी अवैध व्यवसायांच्या बाबतीत गांधारीच्या भुमिकेत

सर्वोच्च न्यायालयाने न्यायदेवतेच्या डोळ्यांवरील पट्टी काढली पण् औंध पोलिस ठाण्याच्या कारभाऱ्यांच्या डोळ्यांवरील पट्टी एस.पी. काढणार?

सातारा :  औंध पोलिस ठाण्याचा विद्यमान कारभाऱ्यांनी कारभार हातात घेतल्यावर ठाण्याच्या हद्दीतील अवैध व्यवसायांवरील जुजबी कारवाया आणि बेरोजगार युवकांना चिमणी पाखरं आणि चक्री सारखे अवैध व्यवसायास प्रोत्साहित करणारी व्यवस्था निर्माण करून दिवसांत लाखोंची उलाढाल सुरू असल्याचे सर्वसामान्य लोकांना दिसते. परंतू सर्वसामान्य जनतेच्या "मते" औंध पोलिस ठाण्याचे विद्यमान कारभारी अवैध व्यवसायांच्या बाबतीत गांधारीच्या भुमिकेत आहेत? की जाणूनबुजून अवैध व्यवसायांकडे दुर्लक्षित केले जाते? हे न समजण्याइतकी सर्वसामान्य जनता दुधखुळी नक्कीच नसावी. शासनाकडून लोकसेवा करण्यासाठी नियुक्त केल्यानंतर संविधानानुसार लोकसेवा करण्यासाठी जो मोबदला विद्यमान कारभाऱ्यांना दिला जातो त्यामध्ये अवैध व्यवसायांना आळा घालण्यासाठीच्या कार्याचा समावेश कदाचित नसावा. किंवा लावलेल्या अवैध व्यवसायांच्या रोपट्यांचे दर महिन्याला मिळणारे "हिरवे" पान काळे पडण्याआधी पदरात पाडून घेण्यासाठी म्हणूनच की काय अवैध व्यवसायांना आळा घालण्याऐवजी संबंधितांना बळ दिले जाते? याचे स्पष्टीकरण संबंधित कारभाऱ्यांनीच देणे उचीत ठरेल. औंध पोलिस ठाण्याच्या हद्दीतील अवैध व्यवसायांमध्ये नव्याने होत असलेल्या वृद्धीसाठी विद्यमान कारभारीच जबाबदार असल्याची चर्चा जोर धरू लागली आहे. जिल्हा पोलिस अधीक्षकांनी जातीने लक्ष घालून औंध पोलिस ठाण्याचा कारभार एखादा 'करेक्ट' अधिकारी देऊन विद्यमान कारभाऱ्यांनी कार्यक्षेत्रात नव्याने लावलेले चिमणी पाखरं आणि चक्री सारख्या अवैध व्यवसायांसह इतर अवैध व्यवसायांना बळ देऊन रोपट्यांचे वटवृक्ष होण्यापूर्वीच त्यांची पाळेमुळे नष्ट होईल असे बंदोबस्त करावे. ज्याप्रमाणे सर्वोच्च न्यायालयाने न्यायदेवतेच्या डोळ्यांवरील पट्टी काढली त्याचप्रमाणे जिल्हा पोलिस अधीक्षक औंध पोलिस ठाण्याच्या विद्यमान कारभाऱ्यांच्या डोळ्यांवरील अवैध व्यवसाय न दिसणारी पट्टी काढणार? की अजून घट्ट करणार? अशी चर्चा परिसरात दबक्या आवाजात सुरू आहेत. 

                      " अवैध व्यवसायीकांच्या "मते" औंध पोलिस ठाण्याचे विद्यमान कारभारी लयभारी" 
 "न पुसता एखादी रेषा कमी करण्यासाठी तिच्या शेजारीच तिच्यापेक्षाही मोठ्ठी रेषा मारली की पहिली रेषा आपोआपच कमी होते. याचप्रमाणे औंध पोलिस ठाण्याच्या हद्दीतील अनधिकृत गौण खनिज वाहतूक, गुटखा, मटका, गांजा, जुगार अशाप्रकारे सुरू असलेले व्यवसाय बंद करून होतकरू तरुणांना बेरोजगार करण्यापेक्षा नव्याने "चिमणी पाखरं" आणि "चक्री" सारख्या व्यवसायांना सुरू करण्यासाठी बळ मिळाल्याने अवैध व्यवसायीकांमध्ये कमालीचा उत्साह निर्माण झाला आहे. परंतू याच कारभाऱ्यांच्या नेतृत्वाखाली कार्यरत असलेल्या पुसेसावळीचे पो.उप.निरीक्षक आणि औंध सह पुसेसावळी दुर क्षेत्रातील इमानेइतबारे काम करणाऱ्या बहुतांश कर्मचाऱ्यांची अक्षरशः मुस्कटदाबी केली जात आहे. त्यामुळेच अवैध व्यवसायीकांच्या "मते" औंध पोलिस ठाण्याचे कारभारी 'लयभारी' असल्याची चर्चा अवैध व्यवसायीकांमध्ये रंगत आहे".
आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला
मुख्यमंत्री पदी एकनाथ शिंदे यांची घोषणा होताच गोव्यात बंडखोर आमदारांचा नाचीन आनंद व्यक्त