सेवागिरी यात्रेत कुठल्याही प्रकारची कमतरता भासू नये अधिकाऱ्यांनी दक्ष राहावे- प्रांताधिकारी शैलेश सूर्यवंशी

पुसेगाव  : पुसेगाव येथील यात्रा कालामध्ये आपत्ती व्यवस्थापन आणि हलगर्जीपणा करू नये तसेच सर्वच विभागातील कार्यालयीन अधिकाऱ्यांनी नियोजन करून यात्रा कालावधीत संसर्गजन्य रोगप्रसारासह इतर सर्व सोयीयुक्त बाबीवर लक्ष देऊन दक्ष राहावे यामध्ये कुचराई झाल्यास संबंधित विभागाच्या प्रमुख अधिकाऱ्यास जबाबदार धरले जाईल यासाठी यात्रा कालावधीमध्ये कुठल्याही प्रकारची कमतरता न भासता मोठ्या प्रमाणात दक्षता घेऊन सर्वतोपरी सहकार्य करावे अशी सूचना व मार्गदर्शन प्रांत अधिकारी शैलेश सूर्यवंशी यांनी केले.
 महाराष्ट्रासह इतर राज्यातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या पुसेगाव तालुका खटाव जिल्हा सातारा येथील श्री सेवागिरी महाराजांच्या 75 व्या अमृत महोत्सवी पुण्यस्मरण निमित्त आयोजित रथोस्थव व यात्रा नियोजनासाठी येथील नारायणगिरी हॉलमध्ये आयोजित केलेल्या विविध शासकीय अधिकाऱ्यांच्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी तहसीलदार किरण जमदाडे, पोलीस उपअधीक्षक गणेश किंद्रे , मठाधिपती श्री सुंदरगिरी महाराज, देवस्थान ट्रस्टचे चेअरमन बाळासाहेब जाधव, पोलीस उपनिरीक्षक बाळासाहेब लोंढे, विश्वस्त गौरव जाधव, संतोष वाघ, सचिन देशमुख, डॉक्टर सुरेश जाधव, रणधीर जाधव, सरपंच विजय मसने, उपसरपंच पृथ्वीराज जाधव, सुरेश शेठ जाधव, तसेच विविध शासकीय विभागाचे अधिकारी उपस्थित होते. प्रांत अधिकारी सूर्यवंशी पुढे म्हणाले यात्रा कालावधीमध्ये लाखो भाविक येत असतात त्यांचे नियोजन होणे गरजेचे आहे. यासाठी शासनाच्या सर्व विभागाने एकत्र बसून नियोजन आणि तयारी करावी कोणतीही अडचण न येता भाविकांना दर्शन घेता यावे तसेच गर्दीवर नियंत्रण राहावे,वाहतुकीसाठी पुरेशा बसेस उपलब्ध व्हाव्यात, रस्ते, पाणी, विज या सुविधा योग्य प्रमाणात मिळण्यासाठी सर्वच विभागांनी समन्वय ठेवून काम करावे. यात्रेतील अन्नपदार्थांच्या सर्व स्टॉलची अन्नभेसळ विभागाकडून तपासणी करण्यात यावी, मनोरंजनासाठी येणाऱ्या मोठ्या पाळण्याची तपासणी पीडब्ल्यूडी च्या यांत्रिक विभागाकडून करण्याची सूचना केली. यावेळी तहसीलदार किरण जमदाडे यांनीही सूचना केल्या. म्हणाले " महसूल आणि अन्य विभागातील जबाबदार अधिकारी कर्मचाऱ्यांच्या नियंत्रण कक्ष मंदिर आवारात कार्यरत राहणार आहे. सर्वच विभागाने यात्रेतील त्यांच्या जबाबदाऱ्या, करण्यात आलेली तयारी आणि उपलब्ध मनुष्यबळाची माहिती दोन दिवसात सादर करायची आहे " पुसेगाव कडे येणारे सर्व रस्ते आणि अंतर्गत रस्ते, रथ मार्ग खड्डे मुक्त करण्याच्या सूचना त्यांनी संबंधित विभागाला दिल्या, पुसेगाव ग्रामपंचायत इकडून पाणीपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी विहिरीचे अधिग्रहण करण्यात आले आहे. स्वच्छतेची कामे पूर्ण करण्यात येत आहेत. फिरत्या शौचालयाची व्यवस्था ही करण्यात आली आहे.बैठकीत आरोग्य, वीज वितरण, पशुसंवर्धन, कृषी, बांधकाम, महसूल, राज्य परिवहन महामंडळ, पोलीस विभागाच्या तयारीचा आढावा घेऊन सूचना देण्यात आल्या विश्वस्त डॉक्टर श्री जाधव यांनीही रथोस्तवाच्या अनुषंगाने सूचना मांडल्या चेअरमन बाळासाहेब जाधव यांनी गाव पातळीवरील विविध योजनांचा आढावा सादर करून आभार मानले.

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

anandi atta chakki V
सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला