कोयना धरणात व पाटण तालुक्यात पावसाची बॅटिंग सुरू
कोयना धरण भरण्यासाठी ११.८० टीएमसी पाण्याची गरजSatara News Team
- Tue 27th Aug 2024 11:39 am
- बातमी शेयर करा

पाटण : कोयना धरणांतर्गत विभागासह पाटण तालुक्यात विश्रांती घेतलेक्या पावसाने पुन्हा एकदा दमदार सुरुवात केल्याने कोयना धरणात मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक सुरू झाली आहे. सध्या धरणात प्रतिसेकंद सरासरी २३ हजार ४५६ क्युसेक्स पाण्याची आवक होत आहे. १०५.२५ टीएमसी पाणी साठवण क्षमता असलेल्या या धरणात सध्या ९३.४५ टीएमसी पाणीसाठा झाल्याने धरण पूर्ण क्षमतेने भरण्यासाठी आता केवळ ११.८० टीएमसी इतक्याच पाण्याची गरज आहे.
दरम्यान , पावसाचे प्रमाण असेच सुरू राहीले तर पुन्हा एकदा कोयना धरणाच्या वक्र दरवाज्यातून पाणी सोडावे लागण्याची शक्यता आहे.
गेल्या काही दिवसांपासून धरणांतर्गत विभागात पावसाने पूर्णपणे उघडीप दिली होती. कडक उन्ह पडल्याने पाऊस गायब झाला की काय असा प्रश्न पडला होता. गतवर्षीप्रमाणे कोयना धरण याही वर्षी भरणार का? असा प्रश्न निर्माण झाला होता. मात्र दोन दिवसांपासून पुन्हा दमदार पाऊस पडत असल्याने धरण पाणीसाठ्यात अपेक्षित वाढ होत आहे. धरणात सध्या एकूण उपलब्ध ९३.४५ टीएमसी पैकी उपयुक्त ८८.३३ टीएमसी पाणीसाठा झाला आहे. एक जूनपासून सुरू झालेल्या या जलवर्षात आत्तापर्यंत कोयना (६१) ४५४९ मिलिमीटर, नवजा (६९) ५४०८ मिलिमीटर, महाबळेश्वर (४९) ५१६९ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. धरणातील पाणीपातळी 2154.4 फूट व 656.641 मीटर इतकी झाली आहे. पाऊस असाच सुरू राहिल्यास धरणाच्या वक्र दरवाजातून पुन्हा पाणी सोडावे लागणार आहे.
दरम्यान अपेक्षित पाऊस पुन्हा सुरू झाल्याने शेतकरी वर्ग सुखावला आहे. याशिवाय कोयना धरण पूर्ण क्षमतेने भरण्यासाठी केवळ ११.८० टीएमसी पाण्याची गरज आहे. सध्या धरणात अपेक्षित असा पाणीसाठा झाल्याने वर्षभरासाठीची पिण्याच्या पाण्याची व शेतीच्या पाण्याची चिंता मात्र मिटली आहे. गेल्या दोन दिवसांपासून पाटणसह परिसरात दिवस-रात्र पाऊस पडत असल्याने हवामानात प्रचंड गारठा निर्माण झाला आहे. सर्वत्र पाणीच पाणी झाले आहे. पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांची चिंता आता मिटली आहे.
स्थानिक बातम्या
माण-खटाव तालुक्यांत 'कानून के हाथ छोटे' झालेत
- Tue 27th Aug 2024 11:39 am
माझं कुणीही काही वाकडं करू शकत नाय; जयकुमार गोरेंनी शड्डू ठोकला
- Tue 27th Aug 2024 11:39 am
गोळीबार करून दहशत माजवणाऱ्या चौघांना अटक
- Tue 27th Aug 2024 11:39 am
ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरेंवर आरोप करणाऱ्या महिलेला 1 कोटीची खंडणी घेताना अटक
- Tue 27th Aug 2024 11:39 am
वडोली निळेश्वर येथील महिला मेळाव्यातून महिला सशक्तिकरण व सबळीकरणाचा नारा
- Tue 27th Aug 2024 11:39 am
रहिमतपुरात अश्लील चाळे चालणाऱ्या कॅफेचालकावर कारवाई
- Tue 27th Aug 2024 11:39 am
संबंधित बातम्या
-
कुडाळ बाजारपेठेमध्ये गणरायाच्या आगमनाची चाहूल, उत्सवपूर्व नियोजनांना वेग
- Tue 27th Aug 2024 11:39 am
-
कुडाळ बाजारपेठेमध्ये गणरायाच्या आगमनाची चाहूल, उत्सवपूर्व नियोजनांना वेग
- Tue 27th Aug 2024 11:39 am
-
जावळीत पावसाने नदी नाले ओढे तुडुंब
- Tue 27th Aug 2024 11:39 am
-
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण झिरो बॅलन्स् खाती तात्काळ उघडून घेणेची सुविधा
- Tue 27th Aug 2024 11:39 am
-
केळवलीतील युवकाच्या खूनप्रकरणी सख्ख्या भावांना पोलीस कोठडी
- Tue 27th Aug 2024 11:39 am
-
धबधब्याचा आनंद घेताना स्वतःच्या जीवाची काळजी घ्या : जितेंद्र डुडी
- Tue 27th Aug 2024 11:39 am
-
आज पासून बदलणार सीमकार्डसंबंधीचे नियम आणि दर
- Tue 27th Aug 2024 11:39 am
-
सातारच्या पर्यटनासाठी ३८१ कोटी ,कऱ्हाडला युवक कौशल्य प्रकल्प
- Tue 27th Aug 2024 11:39 am