कुडाळ बाजारपेठेमध्ये गणरायाच्या आगमनाची चाहूल, उत्सवपूर्व नियोजनांना वेग

जावळी : लाडक्या बाप्पांचा उत्सव अवघ्या काही दिवसांवर आला आहे.जावळी तालुक्यातील बाजारपेठांसह गणेशभक्तांना गणेशोत्सवाची चाहूल लागली असून उत्सवपूर्व नियोजनांना वेग आला आहे.

सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांमध्ये मंडप उभारणीसह वर्गणी,उत्सवकाळातील विविध कार्यक्रमांच्या नियोजनासाठी बैठकांचा धडाका सुरु आहे.

गणेशोत्सव म्हणजे उत्साहाची पर्वणीच असते.यावर्षीचा गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर आल्याने गणेश भक्तांमध्ये उत्साह संचारला आहे.सर्वच गणेश भक्तांमध्ये उत्सवपूर्व नियोजनाला वेग आला असल्याने संपूर्ण जावळी तालुक्यात गणेशोत्सवाची तयारी चालू असून,शहरासह गावोगावच्या सार्वजनिक गणेश उत्सव मंडळांमध्ये उत्सव काळातील कामांच्या नियोजनांसाठी बैठकांचा धडाका सुरु आहे.तसेच बाजारपेठेत सजावट साहित्य व गणेशमूर्तीचे स्टाल व्यापारी व व्यावसायिकांसह बाजारपेठेला गणेशोत्सवाची चाहूल दिसून येत आहे.तसेच नागरिकांनी घरात गणपती बसवण्यासाठी गणपती बाप्पांची मूर्ती बुक करण्यास सुरुवात केली असल्याचे चित्र सध्या जावळी तालुक्यात व परिसरात दिसत आहे.दरवर्षी मोठ्या उत्साहात भक्तीय वातावरणात गणपती बाप्पांची स्थापना केली जाते. गणेश मंडळांनी यावर्षीही मोठ्या उत्साहाने गणेश मंडळांनी मोठ्या उत्साहाने गणेश उत्सवाची स्थापना करण्याची तयारी सुरू केली असून गणपती बाप्पांची मूर्ती घेण्यापासून ते मंडप वेगवेगळ्या प्रकाराचे डेकोरेशन बुक करण्याचे लगबग सुरू आहे. मार्केटमध्ये अनेक व्यापाऱ्यांनी गणपती बाप्पांच्या मूर्ती विक्रीसाठी आणल्या जाते. वेगवेगळ्या प्रकारचे गणपती बाप्पांच्या मूर्ती उपलब्ध होतात.व सजावटीचे साहित्य सुद्धा अनेक प्रकारचे उपलब्ध होतात.गेल्या वर्षीच्या तुलनेत गणपती बाप्पांच्या मूर्तीच्या किमत यावर्षी वाढल्या आहेत.

गणपती बाप्पांच्या सजावटीसाठी बाप्पांचे मुकुट, वस्त्रमाळा, वेगवेगळ्या डिजाईनचे पडदे, मखर, विद्युत रोषणाईचे लाइटिंग, फुल झाडांच्या, कुंड्या, फुलांचे धोरण, कागदी वेगवेगळ्या डिजाईनचे कलर पेपर, रेडीमेड माळा आधी प्रकाराचे साहित्य मार्केटमध्ये उपलब्ध आहे.


जावळी तालुक्यातील मोठी बाजारपेठ असणारी कुडाळ बाजारपेठ या ठिकाणी मंडळ कार्यकर्त्यांनी आपले बॕनर लावले  असून एक प्रकारे येणार्या गनरायाच्या गणेश भक्तीचा उत्साह आणि वातावरण संपुर्ण बाजारपेठेत केलेले दिसून येत आहे.

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

anandi atta chakki V
सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला