जावळीत पावसाने नदी नाले ओढे तुडुंब

जावळी : हवामान खात्याने दिलेल्या रेड अलर्टनुसार जावळी तालुक्यात दोन दिवसापासून मुसळधार पावसाने थैमान घातले असून,या पावसाने सर्वत्र पाणीच पाणी झाले आहे.दरम्यान,पावसाने लोकांच मोठे नुकसान झाले आहे.

गेल्या दोन महिन्यांपासून तालुक्यात पाऊस पडत असून, जमिनीची पाणी धरून ठेवण्याची क्षमता संपली असल्याने पाणी सर्वत्र वाहताना दिसत आहे. ओढे,ओहोळ,नाले तुडुंब भरून वाहत आहेत.

जमिनीत खोलपर्यंत माती ओली झाल्याने शेताच्या बांधाच्या ताली कोसळू लागल्या आहेत. शेतीसाठी हा पाऊस उपयुक्त असून,भाताच्या खाचरांमध्ये पाणी भरून वाहत आहे.

मागील आठवड्यात पावसाने घेतलेल्या विश्रांतीमुळे अनेक ठिकाणचे पाणी कमी झाले होते; परंतू आज झालेल्या पावसाने पुन्हा एकदा सर्वत्र पाणीच पाणी केले आहे. तालुक्यातील वेण्णा, कोयना या दोन धरणांच्या पाणीसाठ्यात वाढ होत असून, अजूनही दोन्ही धरणे शंभर टक्के भरलेली नाहीत. धरणातून विसर्ग न केल्यास ही धरण पूर्ण क्षमतेने भरण्यासाठी हा पाऊस उपयुक्त आहे.

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला
मुख्यमंत्री पदी एकनाथ शिंदे यांची घोषणा होताच गोव्यात बंडखोर आमदारांचा नाचीन आनंद व्यक्त