केळवलीतील युवकाच्या खूनप्रकरणी सख्ख्या भावांना पोलीस कोठडी
Satara News Team
- Tue 2nd Jul 2024 12:13 pm
- बातमी शेयर करा

सातारा : केळवली, ता. सातारा येथील रमेश धोंडीबा जांगळे (वय २५) या युवकाच्या खुनाचे धक्कादायक कारण समोर आले आहे. घरासमोरून जेसीबी नेण्यासाठी जांगळे याने आडकाठी आणल्याच्या रागातून जानकर बंधूनी शिकारीसाठीच्या बंदुकीतून गोळी घालून त्याची हत्या केल्याचे तपासात स्पष्ट झाले आहे. याप्रकरणी शंकर दादू जानकर आणि चिमाजी दादू जानकर (रा. केळवली, ता. सातार), या सख्ख्या भावांना पोलिसांनी अटक केली आहे. न्यायालयाने त्यांना ३ जुलै पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. दरम्यान, गुन्ह्यात वापरलेली बंदूक पोलिसांनी जप्त केली आहे.
मृत रमेश जांगळे आणि जानकर बंधूमध्ये जेसीबी घरासमोरुन नेण्यावरुन वाद झाला होता. या वादातूनच जानकर बंधूनी जांगळे यांचा नित्रळ गावच्या हद्दीत गोळी घालून त्याचा खून केला. रमेशचा मृतदेह सिमेंटच्या पाईपमध्ये सापडला. रमेश आणि जानकर बंधूच्या वादाची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी कौशल्याने खुनाच्या गुन्हयाची उकल केली. शिकारीच्या बंदुकीचा हत्येसाठी वापर केल्याचे स्पष्ट झाल्यानंतर पोलिसांनी ती बंदक जप्त केली. दरम्यान, शवविच्छेदनात मृताच्या शरीरातून काढलेले छर्रे आणि बंदूक फॉरेन्सिक लॅबमध्ये तपासणीसाठी पाठवण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.
जानकर बंधू आणि मृत रमेश जांगळे यांच्यामध्ये यापूर्वी अनेकदा पैशावरुन वाद झाले होते. त्यासंदर्भात सातारा ग्रामीण पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्ह्याची नोंद देखील आहे. तात्कालीक कारणानुसार जांगळे यांच्या घरासमोरुन जानकर यांनी जेसीबी नेल्याने त्यांच्यातील वाद विकोपाला गेला होता. जांगळे नडत असल्यानेच जानकर बंधूनी त्याचा काटा काढल्याचे पोलीस तपासात समोर येत आहे.
स्थानिक बातम्या
शेतात काम करणाऱ्या महिलेचा विनयभंग; म्हसवड पोलिसांत गुन्हा दाखल
- Tue 2nd Jul 2024 12:13 pm
साताऱ्यात हायवेवर वाहतूक अडवून रिल्स बनवणाऱ्या ५ जणांवर पोलिसांची कारवाई
- Tue 2nd Jul 2024 12:13 pm
‘सुखकर्ता’च्या वडूज शाखेचा द्वितीय वर्धापन दिन उत्साहात
- Tue 2nd Jul 2024 12:13 pm
वडूज येथील रास्तभाव दुकानाबाबत दोष आढळल्याने नोटीस....
- Tue 2nd Jul 2024 12:13 pm
सातारा न्यूज राशिभविष्य आज ८/७/२०२५ मंगळवार
- Tue 2nd Jul 2024 12:13 pm
भरदिवसा गळा चिरला :शिवथरमध्ये महिलेचा निर्घृण खून
- Tue 2nd Jul 2024 12:13 pm
संबंधित बातम्या
-
कुडाळ बाजारपेठेमध्ये गणरायाच्या आगमनाची चाहूल, उत्सवपूर्व नियोजनांना वेग
- Tue 2nd Jul 2024 12:13 pm
-
कुडाळ बाजारपेठेमध्ये गणरायाच्या आगमनाची चाहूल, उत्सवपूर्व नियोजनांना वेग
- Tue 2nd Jul 2024 12:13 pm
-
कोयना धरणात व पाटण तालुक्यात पावसाची बॅटिंग सुरू
- Tue 2nd Jul 2024 12:13 pm
-
जावळीत पावसाने नदी नाले ओढे तुडुंब
- Tue 2nd Jul 2024 12:13 pm
-
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण झिरो बॅलन्स् खाती तात्काळ उघडून घेणेची सुविधा
- Tue 2nd Jul 2024 12:13 pm
-
धबधब्याचा आनंद घेताना स्वतःच्या जीवाची काळजी घ्या : जितेंद्र डुडी
- Tue 2nd Jul 2024 12:13 pm
-
आज पासून बदलणार सीमकार्डसंबंधीचे नियम आणि दर
- Tue 2nd Jul 2024 12:13 pm
-
सातारच्या पर्यटनासाठी ३८१ कोटी ,कऱ्हाडला युवक कौशल्य प्रकल्प
- Tue 2nd Jul 2024 12:13 pm